Type Here to Get Search Results !

भरधाव रुग्णवाहिकेने पादचाऱ्याला उडवले; नवले पुलाजवळील घटनेत पादचारी ठार

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 14 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): रस्ता क्रॉस करत असणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेने जोराची धडक दिल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका चालक पसार झाला असून अज्ञात चालकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pune navale bridge accident)

ही घटना मुंबई - बंगळुरू महामार्गावरील (Mumbai Banglore Highway) नऱ्हेगावाजवळील (Narhe) नवले पुलाजवळ असणाऱ्या एचडीएफसी बँकेसमोर (HDFC Bank) सोमवारी (दि. 13 फेब्रुवारी 2023) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कुमार लक्ष्मण अलकुंटे (Kumar Laxman Alkunte) (वय - 31, रा. दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. शेषेराव लक्ष्मण चव्हाण (Sesherao Laxman Chavan) (वय - 46, रा. लक्ष्मी स्पर्श सोसायटी, आंबेगाव खुर्द, पुणे) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात आणि बेशिस्त पादचारी नियमांकडे दुर्लक्ष करून रूग्णवाहिका चालक याने शेषेराव लक्ष्मण चव्हाण हे रस्ता ओलांडत असताना त्यांना जोरदार धडक दिली. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी न घेऊन जाता तो घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यामुळे अज्ञात चालकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव (Police Inspector Rahul Yadav) हे करीत आहेत.

नवले पूल परिसरातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबात नाहीये. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात (Bhumkar Chowk) ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने तब्बल चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघं जखमी झाले आहेत. 11 फेब्रुवारी 2023 शनिवारी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

नऱ्हे येथील भूमकर पुल चौकात दररोज सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास वाहनांची मोठी गर्दी असते. ऐन गर्दीच्या वेळी या कंटेनरचे ब्रेक फेल झाले आणि परिसरात एकच हाहाःकार उडाला. या अपघातात कंटेनरने आधी मागून एका क्रेटा वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर दुचाकी आणि रिक्षासह तीन वाहनांना धडक दिली. वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान राखत दुसऱ्या रस्त्याने येणारी वाहतूक थांबविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.