Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

 

पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे (mohol vidhansabha matdar sangha) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने (NCP MLA Yashwant Mane) यांना सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माने यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर (Bharatpur, Rajasthan) येथून आरोपीला अटक केली. (pune crme news)

रिझवान अस्लम खान (Rizwan Aslam Khan) (वय 24, रा. ग्राम सिहावली महारायपूर, ता. नगर, जि. भरतपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार माने हे पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांना 23 जानेवारी 2023 रोजी फेसबुकद्वारे (Facebook) अनोळखी तरूणीचे मेसेज आले होते. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. 31 जानेवारी 2023 ला फेसबुकवर व्हिडिओ कॉल (Facebook Video Call) आल्यानंतर त्यांना संशय आला. परंतु त्यांना सतत आठवडाभर मेसेज येत होते. त्यामुळे त्यांनी रात्री 10 च्या सुमारास तो व्हिडिओ कॉल उचलला. काही सेंकदांसाठी तो कॉल सुरू राहिला.

आरोपींनी माने यांच्या व्हॉट्सअॅपवर (WhatsApp)अश्लील मेसेज आणि व्हिडिओ (Obscene messages and videos) पाठवून कॉल करुन भूरळ पाडण्याचा प्रयत्न केला. आरोपीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ कॉल माने यांना पाठविला. तसेच, एक लाख रुपये खंडणी न दिल्यास तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

याबाबत माने यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी रिझवान खान याला राजस्थानच्या भरतपूर येथून अटक केली. आरोपीच्या मोबाईलमध्ये 90 अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत. न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

“सेक्सस्टॉर्शनचा प्रकार ऐकून होतो. पण, मी या धमक्यांना बळी न पडण्याचे ठरवले. तरुणांना ब्लॅकमेल करून लुटले जात असून, असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हा प्रकार खूपच भयानक आहे. पुणे पोलिसांचे मी आभार मानतो. अनवधानाने असा प्रकार घडल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी.” असे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार (Commissioner of Police Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint Commissioner of Police Sandeep Karnik), अतिरिक्त आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Additional Commissioner Crime Ramnath Pokle), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner Srinivas Ghadge), सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले (Assistant Commissioner Vijayakumar Palasule) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील (Senior Police Inspector Meenal Supe-Patil) यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यास सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.