Type Here to Get Search Results !

दिवंगत पत्रकार हत्याकांड प्रकरणी पुण्यात पत्रकारांची निदर्शने

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे (Late Journalist Shashikant Warise) यांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी पुणे शहरात बालगंधर्व चौकात (Balgandharva Chowk) पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन (All India Journalists Association) व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या (Maharashtra rajya Marathi patrakar sangh) वतीने बालगंधर्व चौकातील आंदोलनात निषेधच्या घोषणा देण्यात आल्या, तसेच आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. मुख्यमंत्री (chief minister eknath shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांना (deputy chief minister devendra fadanvis) आरोपींवर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

याप्रसंगी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश संघटक अनिल मोरे (Anil More, Regional Convenor, All India Journalists Association), महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे (Maharashtra State Marathi Journalist Association District President Sitaram Landge), ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे शहराध्यक्ष समीर देसाई (All India Journalists Association City President Sameer Desai), संपर्कप्रमुख सागर बोदगिरे (Liaison Chief Sagar Bodgire), अमित कुचेकर (Amit Kuchekar), मोहित शिंदे (Mohit Shinde), दिपक पाटील (Deepak Patil), विशाल भालेराव (Vishal Bhalerao), हवेली तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामगुडे (Haveli Taluka President Pandharinath Namgude), पत्रकार संरक्षण समितीचे अनिल चौधरी (Anil Chaudhary of the Journalists Protection Committee), युवा पत्रकार संघाचे प्रकाश यादव (Prakash Yadav of Youth Journalist Association), शरद पुजारी (Sharad Pujari) यांच्यासह पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

या आंदोलन प्रसंगी आंदोलकांनी दिवंगत पत्रकार शशिकांत वारसे यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच घोषणा देऊन कारवाईची मागणी केली मागण्यांमध्ये प्रामुख्याने या हत्याकांडामागचे प्रमुख सूत्रधार शोधून काढावेत, पत्रकार वारीसे यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांचा निधी द्यावा, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, पत्रकार संरक्षण कायदा सक्षमपणे अंमलबजावणी व्हावी, या खटल्यात ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती शासनाने करावी या मागण्या करण्यात आल्या. तसेच या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी प्रदेश संघटक अनिल मोरे यांनी दिली.

पत्रकारांवर वारंवार हल्ले केले जातात व पत्रकार संरक्षण कायद्याची सक्षमतेने अंमलबजावणी केली जात नाही. आगामी काळात अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली नाही, तर पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष समीर देसाई यांनी दिला.

ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांना रोख स्वरूपात निधी मदत म्हणून देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.