Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपाजवळ (satara road bhapkar petrol pump) रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात गाडी घासल्याने झालेल्या वाद झाला. त्यानंतर दुचाकीस्वार तरूणांनी केलेल्या मारहाणीत रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. याबाबत मयताचा भाऊ मधुकर राजू दांडेकर याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. (pune crime news)
याप्रकरणी मुकील गफुर शेख (mukil gafur shaikh) (रा. कोंढवा) आणि अरबाज मेहबुब शेख (arbaz mehbub shaikh) (रा. काशेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. किरण राजू दांडेकर (kiran raju dandekar) (30, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 6 फेब्रुवारी 2023) रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास घडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास किरण दांडेकर, त्याचा भाऊ मधूकर दांडेकर, बंटी कसबे, निलबा, राजू हे किरणच्या रिक्षातून गॅस भरण्यासाठी भापकर पेट्रोल पंपाकडे जात असताना दुचाकीवर असलेल्या मुकील आणि आरबाज यांच्या दुचाकीला रिक्षा घासल्याने आरोपी आणि किरण यांच्यात वाद झाले. त्याच्या वादाचे पर्यवसन मोठ्या भांडणात (fight) झाले.
यावेळी चाललेल्या भांडणात आरोपीपैकी एकाने किरणच्या छातीवर जोरात लाथ मारली. तो बेशुध्द होऊन खाली पडल्याने त्याच्या त्याचा या मारहाणीत मृत्यू (death) झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारपूर्वीच किरणचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपासात माहिती मिळालेल्या आरोपींच्या दुचाकीच्या चार अंकी नंबरवरून पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपींचा माग काढून लपून बसलेल्या आरोपींना बेड्या ठोकल्या. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (Assistant Commissioner of Police Rajendra Galande), वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, गुन्हे निरीक्षक विजय खोमणे (Crime Inspector Vijay Khomene) यांनी घटनास्थही भेट दिली. पुढील तपास उप निरीक्षक एस. टी. जगदाळे (Sub Inspector S. T. Jagdale) करत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84