Type Here to Get Search Results !

सिंहगड हद्दीतील अवैद्य हुक्का बारवर छापा; ३ जणांविरोधात गुन्हा दाखल, ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  सिंहगड रोड पोलीस स्टेशन (sinhagad police station) हद्दीतील पॉश हॉटेल मध्ये बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या हुक्का बारवर (hookah bar) पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा (raid) टाकत, 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rupees 68 thousand narcotics and hookah confiscated from hotel deccan pavilion)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सिंहगड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात, नवले ब्रिज समोरील डेक्कन पॅव्हेलियन हॉटेल (Deccan Pavilion) येथील रुप टॉपवर, एअर ओ नावाच्या हॉटेलमध्ये अवैद्य हुक्का पार्लर (hookah parlour) चालु आहे, अशी माहिती मिळाली.

त्यामुळे पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार (police commissioner ritesh kumar), पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (Joint Commissioner of Police Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे (ramnath pokale), पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे (amol zende), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) 1 श्री सुनिल पवार (sunil pawar) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (vinayak gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर (shailaja jankar), पोलीस अंमलदार सुजित वाडेकर (sujit wadekar), पांडुरंग पवार (pandurang pawar), प्रविण उत्तेकर (Praveen uttekar), मनोजकुमार साळुंके (manojkumar salunkhe), मारुती पारधी (maruti pardhi), विशाल दळवी (vishal dalvi), संदिप शिर्के (Sandeep shirke), विशाल शिंदे (vishal shinde), संदेश काकडे (sandesh kakade), रेहाना शेख (rehana shaikh), योगेश मोहिते (yogesh mohite) यांच्या पथकाने छापा टाकला.

यावेळी सदरील ठिकाणी पाहणी केली असता, मयुर प्रकाश माने (वय 27 वर्षे रा. सदाशिव दांगट नगर, वडगाव, पुणे), प्रणित संजय पोटपिटे (वय 23 वर्षे रा. दांगट पाटील नगर, शिवणे, पुणे) आणि आदर्श अशोक गज्जर (वय 30 वर्षे रा. एनडीए रोड, संजीवनी हॉस्पीटल जवळ, उत्तमनगर, पुणे) यांचे उपस्थितीत, त्या ठिकाणी ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या तंबाखुजन्य (tobacco) हुक्का पदार्थ पुरवुन, हुक्काबार चालविताना आढळून आले. 

यावेळी 68 हजार रुपये किमतीचे अलफकर (alfakar), रॉयल स्मोक इन (royal smoke in), अफजल (afjal), अलअयान (alayan) या नावाचे तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर, 12 काचेचे हुक्का पॉट (hookah pot), 12 चिलीम (chilim) सह त्यास 12 हुक्का पाईप जोडलेले व त्यास लागणारे साहित्य त्यांचे कब्जात बाळगताना आढळुन आल्याने त्यांचे विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.