Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुरंदर (purandar) तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले सासवड (saswad) शहर अत्यंत झपाट्याने विकसित होत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून सासवड येथील पोलीस ठाण्याच्या (saswad police station) हद्दीत अवैध धंद्यांना (illegal businesses) जोर चढला आहे.
भाजपचे शहर उपाध्यक्ष अमोल जगताप (BJP City Vice President Amol Jagtap) यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Superintendent of Police Ankit Goyal) यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सासवड पोलिसांचे अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. या अवैध धंद्यांचा वेळीच तातडीने बीमोड करण्याची नितांत गरज निर्माण झाली असून, तशी मागणी सासवड शहरात जोर धरत आहे.
घातक रसायनमिश्रित हातभट्टीची दारू सेवन केल्याने शहरातील साठेनगर (Sathenagar) भागात गेल्या चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू झाला असून, आणखी किती जणांचा जीव घेणार, असा सवाल अमोल जगताप यांनी उपस्थित केला.
तसेच,”सासवड शहरातून परिसरातील इतर गावांना गावठी दारू पुरवली जाते. कमी कालावधीत मिळणारा पैसा अवैध दारू धंदेवाल्यांना निर्भीड बनवत आहे. त्यामुळे पैशांच्या जोरावर पोलीस यंत्रणा, शासकीय अधिकारी आपल्या खिशात आहे, अशी त्यांची मानसिकता झालेली आहे.” असेही ते म्हणाले.
दारूच्या व्यसनापायी अनेक कुटुंबाची वाताहात झाली आहे. त्यात शहरातील साठेनगर भागातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहीजण आजाराने अंथरुणाला खिळलेले आहेत. घरातील कर्तापुरुष दारूच्या आहारी गेल्याने हतबल झालेली पत्नी, लहान मुले यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सासवड पोलीस अधिकारी (Saswad Police Officer) यांच्याकडून या कुटुंबांना न्याय मिळावा, हीच अपेक्षा अमोल जगताप यांनी व्यक्त केली.
पुरंदर तालुक्यातील अवैध धंद्यांना ऊत आला आहे. यात रसायनमिश्रित हातभट्टी, देशी-विदेशी दारू विक्री त्याचप्रमाणे परवानगी नसताना टपर्यांमध्ये दारू विक्री करणे, चायनीज सेंटरवर दारू विक्री व पिण्यास परवानगी असणे हे प्रमाण वाढले आहे. हे अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान (challenge) आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84