Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 13 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): यूपीएससीचा (UPSC) अभ्यास करण्यासाठी गेलेला एक 32 वर्षीय विद्यार्थी शनिवारी (दि. 11 फेब्रुवारी 2023) सायंकाळी दिल्लीहून पुण्यात (Delhi to Pune) आला. विमानतळावरून चालत दापोडी (Dapodi) येथे येऊन त्याने दोघांचा खून केला. मारुती उर्फ शंकर नारायण काटे (Maruti aka Shankar Narayan Kate) (वय 60), संगीता मारुती काटे (Sangeeta Maruti Kate) (वय 46, दोघे रा. दापोडी) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. (pune crime news)
याप्रकरणी शगुन रघुनाथ काटे (Shagun Raghunath Kate) (वय 26, रा. दापोडी गावठाण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. प्रसन्ना प्रमोदराव मंगरूळकर (Prasanna Pramodarao Mangrulkar) (वय 32, रा. खेड मक्ता, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे.
खून करून तो स्वतःहून पोलीस चौकीत जाण्यासाठी निघाला. चौकीत जात असताना नागरिकांनी त्याला अडवले आणि पोलिसांना पाचारण केले. त्यांनतर दुहेरी हत्याकांडाचा प्रकार उघडकीस आला. झालेल्या प्रकरणाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव (Senior Police Inspector Bhaskar Jadhav) यांनी माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसन्ना याने बीए (इतिहास) पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्याची आई चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. आई सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रसन्ना याला पिंपरी-चिंचवड (pimpri-chinchwad) येथे एका खासगी बॅंकेत नोकरी लागल्याने ते दोघेजण सन 2015 मध्ये शहरात आले.
दापोडी गावठाणात मारुती उर्फ शंकर काटे यांच्या भाड्याच्या खोलीत दोघेजण राहत होते. आईचे निवृत्ती वेतन आणि प्रसन्ना याच्या नोकरीतून येणारी रक्कम यावर दोघांची गुजराण चालली होती. सन 2017 पर्यंत प्रसन्ना आणि त्याची आई काटे यांच्या खोलीत भाड्याने राहत होते.
दरम्यान, त्याच्या आईवर काटे यांनी अत्याचार केल्याचे त्याचे म्हणणे आहे. यामुळे दोघेजण तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे राहण्यासाठी गेले. तिथे चार महिने राहिल्यानंतर प्रसन्नाच्या आईचे निधन झाले. आई गेल्यानंतर तो एकटा पडला. त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असल्याने यूपीएससीच्या अभ्यासासाठी त्याने सन 2019 मध्ये थेट दिल्ली गाठली.
दिल्लीत असताना त्याला दापोडी येथे त्याच्या आईवर झालेल्या अत्याचाराची आणि दिलेल्या धमकीचा सातत्याने त्रास होत होता, असे त्याचे म्हणणे आहे. सहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा बदला घेण्यासाठी त्याने त्याच्याकडे असलेली संपूर्ण जमापुंजीची 11 लाख रुपये रक्कम एका संस्थेला ऑनलाईन माध्यमातून दान केले. दिल्ली ते पुणे असे विमानाचे तिकीट काढले. बॅगमध्ये एक ब्लॅंकेट, टॉवेल आणि दीड हजार रुपये घेऊन त्याने शनिवारी सायंकाळी पुणे गाठले. विमानतळावरून तो पायी चालत दापोडी येथे आला.
रस्त्याने येताना त्याने एका दुकानातून जमीन खोदण्याचा टिकाव विकत घेतला. त्यानंतर दापोडी गावठाणात काटे यांच्या घरात जाऊन त्याने मारुती उर्फ शंकर काटे यांच्या पाठीत, कमरेवर टीकावाने घाव घालून त्यांचा खून केला. त्याला प्रतिकार करण्यासाठी आलेल्या काटे यांच्या पत्नी संगीता यांच्याही डोक्यात टिकाव घालून दोघांना जागीच ठार केले. त्यानंतर प्रसन्ना याने दोघांच्या रक्ताने त्या दोघांचे मळवट भरले.
रक्ताने माखलेला टिकाव घेऊन तो दापोडी पोलीस चौकीत हजर होण्यासाठी निघाला. रस्त्याने जाताना तो जगदंब असा जयघोष करीत होता. रक्ताने माखलेला टिकाव आणि स्वतःही रक्ताने माखलेल्या अवस्थेत जात असल्याचे पाहून नागरिकांनी त्याला अडवले. नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. प्रसन्ना याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी (दि. 12 फेब्रुवारी 2023) मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84