Type Here to Get Search Results !

उत्तमनगर मध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १६ जणांवर कारवाई, ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, uttamnagar gambling raid

 

पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): उत्तमनगर (Uttamnagar) परिसरात सुरु असलेल्या मटका आणि जुगार (Matka and Gambling) अड्ड्यावर गुरुवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात जुगार खेळत व खेळवत असणाऱ्या 16 जणांवर कारवाई करण्यात आली. तर जवळपास 73 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pune crime news)

पुणे शहरात अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर (Gambling centres) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाकडून (Social Security Cell) कारवाई करण्यात येत असताना, सामाजिक सुरक्षा विभागाला शिवणे (Shivane), उत्तमनगर (Uttamnagar) परिसरात बेकायदेशीर (illegally) मटका जुगार अड्डा चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने पाळत ठेवून त्याठिकाणी छापा (raid) टाकला असता 15 जण पैसे लावुन मटका जुगार खेळत व खेळवत असताना आढळून आले.

यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार अजय राणे (Ajay Rane), मनिषा पुकाळे (Manisha Pukale), तुषार भिवरकर (Tushar Bhivarkar), हणमंत कांबळे (Hanmant Kambale), संदीप कोळगे (Sandeep Kolge), अमित जमदाडे (Amit Jamdade) यांच्या पथकाने जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण 73 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींवर उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.