Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बेकायदेशीर माथाडी (mathadi) मोडून काढत असतानाच खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell) अवैध सावकाराविरुद्ध (illegal moneylender) कारवाईची मोहीम हाती घेतल्याने अवैध सावकारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. उत्तमनगर (Uttamnagar) येथे खंडणी विरोधी पथकाकडून पैशाची परतफेड झाली असताना 11 लाखांची (11 Lakh rupees) खंडणी (Extortion) मागणाऱ्या अवैध सावकारास ताब्यात घेण्यात आले आहे. (pune crime news)
या प्रकरणी संभाजी बबन जावळकर (रा. स्वयंभू रेसिडेन्सी, कोपरेगाव एनडीए रोड) यांनी पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Sr. Pi. Pratap Mankar) यांचेकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केला होता. आनंद परशुराम धोत्रे यांस ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संभाजी बबन जावळकर (Sambhaji Baban Jawalkar) यांनी आरोपी आनंद परशुराम धोत्रे (Anand Parshuram Dhotre) याच्याकडून 10% व्याजाने 8 लाख रुपये घेतले होते. यावेळी आरोपीकडून कर्जास हमी म्हणून फिर्यादी यांच्या धायरी (Dhayari) येथील 2 फ्लॅटची नोटरी करून घेण्यात आली होती.
फिर्यादी यांनी वेळोवेळी रोख व ऑनलाईन मनी ट्रान्सफर द्वारे 14 लाख 70 हजार रुपये धोत्रे यांना दिले होते. 8 लाखाचे 1 लाख 70 हजार वसूल करून देखील अवैध सावकार धोत्रे हा फिर्यादी यास आणखी 11 लाख रुपयांची मागणी करत होता. तसेच पैसे न दिल्यास फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देत होता.
यावेळी वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेनुसार वपोनि मानकर यांनी अवैध सावकाराच्या मुसक्या आवळत त्यास ताब्यात घेतले. वपोनि मानकर यांनी बेकायदेशीर माथाडी मोडून काढत असतानाच अवैध सावकाराविरुद्ध मोहीम हाती घेतल्यामुळे अवैध सावकारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आरोपी धोत्रे विरोधात उत्तमनगर येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84