Type Here to Get Search Results !

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे गिधाड गजाआड; विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी मागितली होती लाच

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 20 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये आईची बांधकाम कामगार मजूर म्हणून नोंद असल्याने तिच्या निधनानंतर त्याला कामगार विम्यापोटी (insurance) 2 लाख 34 हजारांची रक्कम मिळणार होती. मात्र, त्यासाठी कार्यालयात येताच विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी 1 लाख रुपये देण्याची मागणी (bribery) एका महिलेसह 56 वर्षीय व्यक्तीने केली. (pune crime news)

त्यासाठी ॲडव्हान्स म्हणून 10 हजार रुपये घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. योगिता अरुण शेंडगे (Yogita Arun Shendge) (वय 40, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), फारुख हनीफ पठाण (Farooq Hanif Pathan) (वय 56, रा. भाऊ पाटील चाळ, बोपोडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या महिनीनुसार, तक्रारदार यांच्या आईचे फेब्रुवारी 2022 मध्ये निधन झाले. त्यांची बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये बांधकाम मजूर म्हणून नोंदणी असल्याने त्यांना कामगार विमा म्हणून 2 लाख 34 हजार रुपये कामगार कार्यालयाकडून मिळणार होती. त्यासाठी तक्रारदार कामगार कार्यालयात आले होते. (pune crime news)

त्यावेळी योगिता शेंडगे व फारुख पठाण यांनी त्यांना रक्कम मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळी कागदपत्रे मागवून घेतली. त्यावरून ते तेथील कर्मचारी असल्याचा त्यांचा समज झाला. योगिता हिने शेंडगे यांनी साहेबांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी ॲडव्हान्स म्हणून 10 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Bribery Department) धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी 14 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी वाकडेवाडी येथील कामगार कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 10 हजार रुपये लाच घेताना योगिता शेंडगे हिला पकडण्यात आले. तिला साहाय्य करणाऱ्या फारुख पठाण यालाही पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. (pune crime news)

पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Superintendent of Police Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (Additional Superintendent of Police Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुणे एसीबी युनिटचे पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर (Pune ACB Unit Police Inspector Praneta Sangolkar) तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.