Type Here to Get Search Results !

वारजे मधील जुगार, मटका अड्ड्यावर छापा; 14 जणांवर गुन्हा दाखल, 17 हजारांचा मुद्देमाल जप्त

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे पोलीस स्टेशन हद्दीत सह्याद्री नॅशनल स्कूल पासून हाकेच्या अंतरावर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर (Matka Gambling Den) पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell) छापा टाकून 14 जणांवर गुन्हा दाखल करत, 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (pune crime news)

याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरातील सह्याद्री नॅशनल स्कूल पासून रामनगरकडे (Ramnagar) जाणाऱ्या रोडवर काहीजण बेकायदेशीर मटका जुगार खेळत आणि खेळवत असल्याची माहिती खबऱ्याकडून पथकाला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे (Additional Crime CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे (DCP Crime Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, अमित जमदाडे यांच्या पथकाने पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 छापा टाकला. (pune crime news)

यावेळी 13 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वारजे पोलीस स्टेशन मध्ये (Warje Police Station) मटका जुगार अड्ड्याच्या चालकासह 14 जणांवर महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.