Type Here to Get Search Results !

पतसंस्थेमध्ये कोट्यावधींच्या अपहारप्रकरणी सोन्याचा शर्ट घालणारे संस्थापक संचालक गजाआड

 

पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): येवला (Yeola) येथील कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या (Subhash Chandra Parakh Urban Co-operative Credit Institution) सुमारे 22 कोटींच्या अपहारप्रकरणी पतसंस्थेचे संस्थापक संचालक तथा येवल्याचे माजी नगराध्यक्ष पंकज सुभाष पारख (Former mayor of the Municipality of Yeola, Pankaj subhash Parakh) यांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Police Financial Offenses Branch) अटक केली आहे.

पंकज पारख हे येवला नगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष असून, त्यांचा कापड व्यवसाय आहे. पारख यांनी त्यांच्या वाढदिवसाला नाशिकच्या (nashik) सुवर्णकारांकडून सुमारे 1 कोटी रुपयांचा 4 किलो वजनाचा सोन्याचा शर्ट तयार करून परिधान केला होता.

 

त्यामुळे ते राज्यात प्रकाशझोतात आले होते. मात्र, पतसंस्थेच्या गैरव्यवहारानंतर पारख यांना अटकेची कारवाई टाळण्यासाठी पसार व्हावे लागले. वाढदिवसाला गोल्डशर्ट परिधान करणाऱ्या पारख यांच्यासह 17 संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. संशयित पारख यांना तिडके कॉलनीतील अनमोल नयनतारा (anmol nayantara) या ठिकाणावरून अटक (arrest) करण्यात आली. (Parakh nagri patasanstha Fraud case yeola gold shirt man pankaj Parakh arrested nashik crime news)

जिल्हा न्यायालयात त्यांना हजर केले असता, येत्या 10 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अपहारप्रकरणी नोव्हेंबर 2021 मध्ये येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात संस्थापक संचालक असलेले पंकज पारख यांच्यासह अध्यक्ष योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि चार वसुली अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित पारख हे पसार होते.

 

कै. पारख पतसंस्थेतील 21 कोटी 96 लाख 99 हजार 850 रुपयांचा गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पतसंस्थेचे 11 हजार 326 ठेवीदार असून, संचालक मंडळासह अध्यक्ष व व्यवस्थापकांनी चुकीचे व नियमबाह्य कर्ज वाटप केले. 26 ऑगस्ट 2021 रोजी पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त झाले. त्यानंतर पतसंस्थेवर प्रशासक म्हणून सहायक निबंधक प्रताप पाडवी (Pratap Padvi) यांची नियुक्ती झाली. यावेळी 1 एप्रिल 2015 ते 21 नोव्हेंबर 2021 पर्यंत गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत समोर आले. त्यानुसार पाडवी यांनी येवला शहर पोलिसांत गैरव्यवहाराची फिर्याद दिली होती.

 

गुन्ह्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हेशाखेला संशयित पारख नाशिकमध्येच उंटवाडी (untawadi) परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम (Police Inspector Ashok Meshram) यांनी गुरुवारी (दि. 2 फेब्रुवारी 2023) रात्री पारख यांना अनमोल नयनतारा परिसरातून अटक केली.

पारख हे कारमध्ये असताना पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. त्यांना शुक्रवारी (दि. 3 फेब्रुवारी 2023) जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांना येत्या 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील संशयित योगेश सोनी (Yogesh Soni) व अजय जैन (Ajay Jain) हे अद्यापही फरार आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.