Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 23 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): स्वत:ची मोटारसायकल पाडून ती पेटवून देण्यास विरोध केल्याने पोलिसांना पाईपाने मारहाण (Beating) केली. “मी मंगेश कदम याचा नंबरकारी आहे, तुमची चांगली जिरवतो, मी तुम्हा पोलिसांना सोडत नसतो, तुमचा खून करुन टाकतो.” अशी धमकी (Threat) देणार्या पंटरला हवेली पोलिसांनी अटक केली. ही घटना अखिल कोल्हेवाडी शिवजयंती उत्सव मंडळाजवळ (Akhil Kolhewadi Shivjayanti Utsav Mandal) 19 फेब्रुवारीला सायंकाळी 8:15 वाजता घडली. (Pune Crime News)
याप्रकरणी पोलीस हवालदार विलास प्रधान (Police Constable Vilas Pradhan) (वय 39, रा. कोल्हेवाडी) यांनी हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 59/23) दिली होती. वैभव बाळासाहेब इक्कर (Vaibhav Balasaheb Ikkar) (वय 22, रा. कोल्हेवाडी, ता. हवेली) असे अटक (Arrest) केलेल्या गुंडाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार प्रधान व पोलीस नाईक मुंढे (Police Naik Mundhe) हे शिवजयंतीनिमित्त कोल्हेवाडी येथे बंदोबस्त करीत होते. कोल्हेवाडी शिवजयंती उत्सव मंडळाचा कार्यक्रम सुरु असताना वैभव हा मोटारसायकलवरुन तेथे आला. मोठमोठ्याने त्याने मोटारसायकल रेस केली. त्यामुळे कार्यक्रमाला जमलेले लोक इकडे तिकडे झाले. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्याने मोठमोठ्याने आरडा ओरडा करत “मी कोण आहे तुम्ही ओळखत नाही का” असे म्हणून स्वत:ची मोटारसायकल खाली पाडली. “आता ही तुमच्यासमोर गाडी जाळून टाकतो.” असे म्हणून जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कार्यक्रमातील लोकांना धोका होऊ नये, म्हणून त्याला पोलीस ताब्यात घेत असताना त्याची आई आली व तिने “वैभ्या पोलिसांना सोडू नको मार यांना” असे म्हणत पोलिसांचे जर्किंन पकडत पोलिसांना धक्काबुक्की केली. वैभव याने तेथील पाईप उचलून पोलिसांना मारहाण केली. (Pune Crime News)
तरी पोलीस नाईक मुंढे यांनी त्याला पकडून ठेवले. तेव्हा त्याने शिवीगाळ करीत “मी तुम्हा पोलिसांना सोडत नसतो. तुमचा खून करुन टाकतो. मी मंगेश कदम याचा नंबरकारी आहे. तुमची चांगली जिरवतो.” असे म्हणून पोलिसांना धमकी दिली. यामध्ये दोन्ही पोलीस कर्मचारी यांना दुखापत झाली. पोलिसांनी वैभव इक्कर याला अटक केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84