Type Here to Get Search Results !

कोथरूड, सिंहगड रोडसह घरफोडीच्या सात घटना; पुणे शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून नारायण पेठ (narayan peth), कोथरूड (kothrud), मानाजीनगर (manajinagar), धायरी (dhayari), कोंढव्यातील भाग्योदयनगर (kondhwa bhagyodaynagar), फुरसुंगी (fursungi), ससाणेनगर (sasanenagar) अशा सात ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी (burglary) करत तब्बल 8 लाखांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे.

के. व्हीनम (k vhinam) (74, रा. अवंती अपार्टमेंट, अलकापुरी सोसायटी, कोथरूड) याचे राहते घर 1 फेब्रुवारी ते 2 फेब्रुवारी 2023 दरम्यान बंद असताना पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, परदेशी चलन, पाच तोळ्यांचे दागिने असा 1 लाख 84 हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत मिक्की किसन परदेशी (mikki kisan pardeshi) (वय 37) यांचे फुरसुंगीतील संकेत विहार येथे श्री कृष्ण निवास नावाचे घर आहे. त्याच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी दागिने, रोख रक्कम व चारचाकी गाडी असा 2 लाख 49 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत कोंढवा खुर्द येथील भाग्योदयनगरमधील मेहबूब अलीसाहब शेख (40) यांचा ताहिरा हिल्समधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी 1 लाख 5 हजारांचा ऐवज चोरून नेला. शेख यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चौथ्या घटनेत सिंहगड पोलीस ठाण्याच्या (sinhagad police station) हद्दीत सम्राट भैरवनाथ बालगुडे (samrat bhairavnath balgude)(34, रा. शिवराय कॉम्प्लेक्स, आंबामाता रोड, धायरी) यांचे किराणामालाचे दुकान फोडून चोरट्यांनी 90 हजारांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला.

पाच्या घटनेत शरणम्मा मल्लीनाथ कवलगी (sharnamma mallinath kavalagi) (23, रा. वैष्णवी अपार्टमेंट, नारायण पेठ, मोदी गणपतीजवळ) यांनी घराच्या दरवाजाला कुलूप लावून चावी बाहेरील गादीखाली ठेवली होती. त्या चावीच्या आधारे चोरट्याने कुलूप उघडून घरातील रोख रक्कम, दागिने असा 62 हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार शनिवारी रात्री बारा ते सव्वाएकच्या सुमारास घडला.

सहाव्या घटनेत गुन्ह्यात रेहाना इजार अन्सारी (rehana ijar Ansari) (वय 50, रा. नवीन म्हाडा कॉलनी, ससाणेनगर) यांची राहत्या घराजवळ पानाची टपरी आहे. चोरट्यांनी त्यांच्या पानाच्या टपरीचा मागून पत्रा उचकटून आतील 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (hadapsar police station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.

सातव्या घटनेत शुभांगी नितीन खटावकर (shubhangi nitin khatavkar) (38, रा. मल्हार हाईट्स, मानाजीनगर, नर्‍हे) यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 13 हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.