Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): एकाच चोरट्याने एकट्याने एका पाठोपाठ तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील
दागिने हिसकावून (Jewellary
snatched) नेण्याचा प्रकार रविवारी (दि. 5 फेब्रुवारी 2023) दिवसभरात घडला आहे. या तिन्ही
चोऱ्या एकाच चोरट्याने केल्याचा पोलिसांना संशय आहे. (pune crime news)
यातील पहिली
घटना कोथरुडमधील (kothrud
mahatma society) महात्मा सोसायटीतील भुजबळ टाऊनशिप (mahatma
society bhujbal township) येथे दुपारी 2:45
वाजता घडली. याबाबत एका 56 वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station)
फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मुलीसह एका कार्यक्रमावरुन घरी जात होत्या.
त्यावेळी त्यांची मुलगी खरेदी करण्यासाठी दुकानात गेल्याने त्या रस्त्याच्या कडेला
वाट पहात थांबल्या होत्या. तेव्हा मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या
गळ्यातील 1 लाख 90 हजार रुपयांचे 50 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हिसकावून नेले.
दुसरी घटना
कर्वे रोडवरील (karve road) डेक्कन जिमखान्यावरील (Deccan Gymkhana) सावरकर
चौकात (Savarkar Chowk) दुपारी 3:30 वाजता घडली. याबाबत हडपसर (hadapsar) येथील एका 32 वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (deccan police station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी या आपल्या पतीसह मोटारसायकलवरुन जात होत्या.
सावरकर चौकात सिग्नल लागल्याने ते सिग्नलला थांबले होते. त्यावेळी पाठीमागून
आलेल्या मोटारसायकलवरुन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 30
हजार रुपयांचे 11 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने
हिसकावून तो पळून गेला.
तिसरी घटना
बिबवेवाडी (Bibwewadi) येथील पासलकर चौकाजवळ (pasalkar chowk) रविवारी (दि. 5 फेब्रुवारी 2023) दुपारी 1 वाजता घडली. याबाबत पर्वती दर्शन येथील एका 52 वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी
पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या पतीसह मोटारसायकलवरुन घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या
चोरट्याने त्यांच्या घरातील 17 ग्रॅम वजनाचे 55 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. परंतु, त्यांनी हे मंगळसुत्र धरल्याने त्याचा अर्धा भाग चोरट्याकडे गेला. तो घेऊन
चोरटा पळून गेला.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84