Type Here to Get Search Results !

खडकवासला धरण क्षेत्रात कुडजे गाव हद्दीत अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

 

पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): खडकवासला धरणाच्या (khadakwasla dam) पाण्यात एनडीए-बहुली रस्त्यावरील (NDA bahuli road) कुडजे गावच्या (kudje) हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह (dead body) आढळून आला आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे असावे असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पीएमआरडीए (PMRDA) च्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला (Nanded City Fire Station) खडकवासला धरणाच्या पाण्यावर कुडजे गावच्या हद्दीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती पुणे शहर अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून मिळाली.

पीएमआरडीएचे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील (Fire Officer Sujit Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल रोकडे (Atul Rokade), किशोर काळभोर (Kishor Kalbhor), श्रीकांत आढाव (Shrikant Aadhav), सूरज इंगवले (Suraj Ingawale) व विशाल घोडे (Vishal Ghode) या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू केली. ज्या ठिकाणी मृतदेह तरंगत होता त्या ठिकाणी उतरणे अवघड असल्याने नौदलाच्या बोटीने अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाजवळ पोहोचले व मृतदेह पाण्याबाहेर काढला.

ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता तेथे उतरणे शक्य नसल्याने व तेथे संबंधित व्यक्तीचे कपडे किंवा इतर वस्तू दिसून न आल्याने मृतदेह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील इतर ठिकाणाहून वाहत येऊन येथे खडकाजवळ अडकला असावा असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवला आहे.

उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर (Police Inspector Sunil Jaitapurkar) यांच्या सूचनेनुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून याबाबत पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.