Type Here to Get Search Results !

माजी विद्यार्थ्यांकडून भारती विद्यापीठ संचालित या शाळेत करण्यात आले मोफत शालेय साहित्याचे वाटप

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भारती विद्यापीठाचे शंकरराव मोरे विद्यालयात (Bharati Vidyapeeth Shankarrao More Vidyalaya) माजी विद्यार्थी व माझी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विजय वडवेराव (Vijay Vadverao) यांच्या माध्यमातून भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण विभागाचे संचालक एम. डी. कदम (Bharti University School Education Department Director M. D. Kadam) यांच्या हस्ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

कोरोनाच्या काळात सगळ्याच शाळांच्या विद्यार्थ्यांची वाताहत झाली. त्याचा जबरदस्त फटका शाळा आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनाही बसून शैक्षणिक गुणवत्ता कमी झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर वडवेराव यांनी मोरे विद्यालयात मुलांची वाचन लेखन गुणवत्ता सुधारण्यासाठी, पायाभूत बाबी व्यवस्थित करून घेण्यासाठी एम. डी. कदम यांच्या सहाय्याने आनंददायी वाचन प्रकल्प डिसेंबर पासून राबविण्यात येत आहे.

 

शंकरराव मोरे विद्यालयात शिकणारी मुले ही आजूबाजूच्या वाडयाम, वस्त्या, झोपडपट्टयातील गोर गरीब कष्टकरी समाजातील, घरकामे करणाऱ्या लोकांची मुले आहेत. या गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मोरे विद्यालयात माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला आहे. या संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास मोरे विद्यालयाचे प्राचार्य आप्पासो नलगे (Principal Appaso Nalage), पर्यवेक्षक जी. बी. जाधव (Supervisor G. B. Jadhav) व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.