Type Here to Get Search Results !

सिंहगड रस्त्यावरील या मोठ्या सोसायटीत झाडे तोडताना विजेचा धक्का बसून कामगाराचा मृत्यू

 

पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  माणिक बाग (manik baug) येथील एका मोठ्या गृहप्रकल्पात झाडांची छाटणी करत असताना कामगाराचा विजेच्या तारेस स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अशोक मारुती सोन्नर (ashok maruti sonnar)(वय 38, रा. शिवनेरी नगर, कोंढवा पुणे) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. (pune electric shock accidental death)

मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता (sinhagad road) परिसरातील माणिक बाग येथील कुदळे पाटील टाऊनशिप (kudale patil township) येथे झाडे तोडण्याचे काम सुरू होते. यावेळी झाडे तोडणाऱ्या कामगाराचा संपर्क जवळच असलेल्या विद्युत वाहिनीशी आल्याने विजेचा धक्का बसून कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

 

घटनास्थळी माहिती मिळताच आनंदनगर (anadnagar) येथील अग्निशमन दल (fire brigade) तसेच सिंहगड पोलीस उपस्थित झाले. त्या ठिकाणी उच्च दाब विद्युत वाहिनी असल्याने कामगाराचा संपर्क येतातच त्याच्या कपड्याने पेट घेतला आणि त्यातच त्या कामगाराचा अंत झाला. आनंद नगर अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रभाकर उमराटकर (Central Chief of Anand Nagar Fire Brigade prabhakar umratkar), केंद्र अधिकारी प्रकाश गोरे (Central Officer Prakash Gore), तांडेल संतोष भिलारे (Tandel Santosh Bhilare), अग्निशमन जवान राकेश बरे (Firefighter Rakesh Bare), आदिनाथ पवार (aadinath pawar) उपस्थित होते.

 

यानंतरही ही घटना घडली त्या ठिकाणी विद्युत वाहिन्या दोन इमारतींच्या मधून जाणार्‍या होत्या. या भूमिगत का नव्हत्या?, विदुयत वाहिनी ज्या भागातून जात आहेत त्या ठिकाणी सुरक्षित यंत्रणा का नाही?, विदूत वाहिनीच्या जवळ पर्यन्त तिथे पत्र्याचे बांधकाम कसे करण्यात आले?, तसेच कामगारांसाठी झाडे तोडतांना सुरक्षा यंत्रणा नव्हती का? ही प्रश्ने अजूनही अनुत्तरित आहेत.

 

पुढील अधिक तपास सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Shailesh Sankhe, Senior Police Inspector of Sinhagad Police Station) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अक्षय पाटील (Police Inspector Akshay Patil) करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.