Type Here to Get Search Results !

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेत आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ४८ जोडपी विवाहबद्ध

 

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्राच्या 56व्या निरंकारी संत समागमाची (56th nirankari sant samagam) विधिवत सांगता झाल्यानंतर दिनांक 30 जानेवारी, 2023 रोजी औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी (DMIC) येथील मैदानावर सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज (Sadguru mata sudikshaji maharaj) आणि निरंकारी राजपिता रमितजी (nirankari rajpita ramitji) यांच्या पावन सान्निध्यात अत्यंत मंगलमय वातावरणात 48 जोडप्यांचा सामूहिक विवाह (marriage) सोहळा संपन्न झाला.

साध्या व सामूहिक विवाहांना चालना देण्याच्या संत निरंकारी मिशनच्या सामाजिक सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत साधेपणाने, पण तरीही अत्यंत प्रभावशाली स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपारिक ‘जयमाला’ (पुष्पहार) आणि प्रत्येक जोडप्याच्या गळ्यात ‘सामायिक हार’ (सांझा हार) घालून करण्यात आला. त्यानंतर सुमधूर संगीताच्या चालीवर पवित्र मंत्रांच्या रुपात असलेल्या चार ‘निरंकारी लांवां’चे (मंगलाष्टक) गायन करण्यात आले. प्रत्येक ‘लांवां’च्या शेवटी सदगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी तसेच विवाहासाठी आलेले नवदांपत्यांचे नातलग व उपस्थित भाविक-भक्तगणांकडून वधुवरांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.
विवाह समारोहाच्या शेवटी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नवविवाहित दांपत्यांना (newly married couples) आपल्या दिव्य वाणी द्वारे पावन आशीर्वाद प्रदान करताना सांगितले, की या समारोहामध्ये वर-वधूंचे वैवाहिक नाते जोडले गेल्याने दोन्ही बाजुच्या परिवारांचे मिलन घडून आले आहे. त्यांनी एकमेकांचा मनापासून स्वीकार करावा. वर-वधूंनी आपसात ताळमेळ ठेवून प्रेम, नम्रता यांसारख्या दिव्य गुणांचा अंगिकार करावा आणि जीवनात येणाऱ्या अडी-अडचणींची सोडवणूक करावी. निरंकारी विवाहांचे वैशिष्ट्य असलेला सामायिक हार हा गृहस्थीची जबाबदारी पती-पत्नी दोघांचीही समान आहे. त्यांनी आपल्या जीवनात सत्संग, सेवा आणि स्मरण करत निराकार प्रभूला प्राथमिकता द्यावी. शेवटी, सदगुरु  माताजींनी नव विवाहित दांपत्यांच्या जीवनात आध्यात्मिक पैलू सदृढ राहावा आणि त्यांचे जीवन आनंदमय व्हावे, अशी मंगल कामना केली.
आजचा हा विवाह सोहळा आंतरराज्यीय स्वरुपाचा होता. महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, औरंगाबाद, चिपळूण, नाशिक, सोलापूर, डोंबिवली, सातारा, नागपूर, रायगड, कोल्हापूर आणि अहमदनगर क्षेत्रातील वर-वधू या विवाह सोहळ्यात सहभागी होते. या व्यतिरिक्त पंजाब, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथूनही वर-वधू आले होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.