Type Here to Get Search Results !

पत्रकारांच्या प्रश्नांवर बिचुकले उचकले; कसबा विधानसभा मतदार संघात भरली उमेदवारी

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मागील काही दिवसांपासून पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीची धामधूम सुरू आहे. यादरम्यान काल पत्नीचा उमेदवारी अर्ज भरायला आलेला बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे चर्चेचा विषय ठरले. बिग बॉस फिल्म अभिजीत बीचुकले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर बीचुकले यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. (bigg boss abhijeet latest news)

कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा (Kasba by-election) अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी (Abhijet Bichukale received a death threat over the phone) देण्यात आली. ‘अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा…’ याप्रकारच्या धमक्या येत असल्याचा बिचुकले यांचा आरोप आहे. यानंतर अभिजीत बीचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहीलं आहे.

कसब्यातले प्रमुख प्रश्न कोणते आहेत, असा प्रश्न विचारला असता बिचुकले पत्रकारांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.

कसबा निवडणुकीसाठी आपली पत्नी अलंकृता (abhijit bichukale wife) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अभिजीत बिचुकले यांना माध्यमांनी कसब्यातले प्रमुख प्रश्न कोणते याविषयी विचारलं. त्यावर त्याने उत्तर देताना बिचकुले संतापून म्हणाले,“जे निवडून गेलेले, त्यांनी काय केलं, त्यांना विचारा. मला प्रश्न माहित नाहीत, जनतेला माहित आहेत. जनतेसाठी मी सर्वस्व आहे. तुम्ही सांगा मी सोडवणार.” असं उत्तर त्यांनी दिलं.

“या मतदारसंघातून निवडणूक लढवणार तर तिथला तुम्ही काही अभ्यास केला असेल ना.” असं पत्रकारांनी विचारलं असता बिचुकलेने माध्यम प्रतिनिधींनाच सुनावलं आहे. “माझा अभ्यास काढू नका, तुझा किती अभ्यास आहे. मी कसब्याचा उमेदवार आहे. उद्याचा नेता, भावी मुख्यमंत्री आहे. हा माझा स्थायीभाव आहे, मी चिडलो नाहीये.” अशा शब्दात बिचुकलेने पत्रकारांना सुनावलं.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.