Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू
झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba By-elections) मंगळवारी (दि. 7 फेब्रुवारी 2023) आणखी एक नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. याठिकाणी
अभिजित बिचुकले (abhijit bichukale) आणि लहुजी छावा
संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. (pune elections)
अभिजित बिचुकले निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आले
होते. त्यावेळी हा प्रकार घडला. अभिजित बिचुकले या परिसरातून जात असताना
त्याठिकाणी लहुजी छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे (Lahuji
Chhawa Association President Sachin Ingle) उपस्थित होते. तेव्हा
सचिन इंगळे आणि लहुजी छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी अभिजित बिचुकले
यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा अभिजित बिचुकले यांनी
संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोटो काढायचा असेल तर गळ्यातील लहुजींचा रुमाल काढावा
लागेल, असे म्हटले.
या गोष्टीचा लहुजी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना
राग आला. तेव्हा सचिन इंगळे आणि अभिजित बिचुकले यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
दोघेही एकमेकांना काहीबाही बोलू लागले. तेव्हा उपस्थितांपैकी काही लोकांनी
हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सचिन इंगळे येथून निघून गेले
आणि हा वाद थांबला.
कसब्याची पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपने टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याच्या मुद्द्यावरुन कसब्यातील ब्राह्मण समाज नाराज झाला होता. या नाराजीची दखल घेत भाजपने उमेदवारीबाबत पुनर्विचार करायची तयारी दर्शविली होती.
“महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास आम्ही टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी देऊ. आमचा फॉर्म आणि इतर कागदपत्रे तयार आहेत.” असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते.
भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane of BJP) आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यातील लढतीमुळे कसबा पोटनिवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीच्या रिंगणात अभिजित बिचुकले यांनीदेखील उडी घेतली होती. दोन दिवसांपूर्वीच अभिजित बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, अलंकृता बिचुकले यांनी कसब्याची पोटनिवडणूक लढायची ठरवल्यास त्यांच्या प्रचारासाठी अभिजित बिचुकले सक्रिय होण्याची शक्यता आहे.
अभिजित बिचुकले यांनी यापूर्वी आमदारकी, खासदारकीपासून ते अगदी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आहे. 2019 साली त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आजपर्यंत त्यांना एकाही निवडणुकीत यश मिळाले नव्हते. याशिवाय, टेलिव्हिजनवरील बिग बॉस या कार्यक्रमातही अभिजित बिचुकले सहभागी झाले होते. त्यामुळे बिचुकले यांना अमाप प्रसिद्धी मिळाली होती.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84