Type Here to Get Search Results !

आज मध्यवर्ती पुणे शहराला करावा लागणार वाहतूक कोंडीचा सामना; काम नसेल तर शहरात जाऊ नका

 


पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (kasba peth election) भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी भाजपा (BJP) आणि कॉंग्रेसच्या (Congress) प्रमुख उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज (Application for candidacy) भरण्यासाठी आज सोमवार दि. 6 फेब्रुवारी 2023 सकाळी 11 वाजल्यापासूनचे मुहूर्त काढले आहेत. हे अर्ज भरण्यासाठी उमेदवार मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता असल्याने मध्यवर्ती पेठांमध्ये (peth area) वाहतूक कोंडी (pune traffic) होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. (Pune Politics)

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण चांगलच तापलं आहे. भाजपा कडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या दरम्यान आज सोमवार दि. 6 फेब्रुवारी 2023 सकाळी कसबा पेठेतून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांची (Ravindra Dhangekar) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी कॉंग्रेस आणि भाजपाचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यात दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा मार्ग कसबा गणपती (kasba ganapati) व दगडूशेठ गणपतीचे (dagadusheth ganapati) दर्शन घेऊन अर्ज भरण्यास जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

त्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते समोरासमोर येऊन संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर ठेवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एकाचवेळी हे उमेदवार आणि कार्यकर्ते कसबा गणपती पासून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि नंतर तिथून पुढे मंडई (pune mandai) पासून थेट स्वारगेट (swargate) पर्यंत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करत, गणेश कला क्रीडा (ganesh kala krida) मध्ये जातील. याची परिणीती पेठांमधील सर्व रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांचे नाव जाहीर झाले आहे, त्यामुळे कसब्यात आता या दोघांमधील लढत पाहायला मिळेल. दरम्यान या दोघांची नावे जाहीर झाल्याने निवडणूक (kasba peth election) अधिक रंगतदार होईल असे बोलले जात आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.