Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा
पुण्यस्मरण दिन (Narveer
Subhedar Tanaji Malusare Death Anniversary) तिथीनुसार माघ वद्य
नवमीला अर्थात यावर्षी बुधवार दि. 15 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. हा दिवस सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रम आणि
बलिदानामुळे “शौर्य दिन” (Shaurya Din) म्हणूनही ओळखला जातोय. कोंढाण्याच्या (kondhana) (सिंहगड)
भूमीतील कोळीवाड्यावर आजही पारंपरिक पद्धतीने अमृतेश्वराचा उत्सव व यात्रा भरवली
जाते. तसेच पारंपरिक जागरण गोंधळ कार्यक्रम देखील केला जातो. (pune news)
यंदाही असाच उत्सव आणि यात्रा माघ वद्य अष्टमीला मंगळवार दि. 14 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. मौजे दुर्गदरा (घेरा सिंहगड) येथील अमृतेश्वर मेट - (कोळीवाडा)
(koliwada) येथे प्रथा - परंपरेनुसार श्री. अमृतेश्वराची यात्रा-उत्सव
साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाचे नियोजनाचाच एक भाग म्हणून ऐतिहासिक कोळीवाडा
आणि येथील परिसराची एकुणच साफसफाई करण्यासाठी मोहीम राबवली जाते. गेली काही वर्षे
गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य (Gadkille Sanvardhan Sanstha
Maharashtra Rajya) ही सामाजिक संस्था हे कार्य पार पाडत आहे.
यंदाही या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घेरा सिंहगडच्या कुशीतील कोळी वाड्यावर
(आदिवासी पाडा) अमृतेश्वर मेट व येथील ऐतिहासिक अमृतेश्वर मंदिर परिसरात साफसफाई मोहीम
राबवली.
श्री अमृतेश्वर मेटावरील असलेल्या शुरवीर खंडोजी नाईक (Shoorvir Khandoji Naik) (घेरे
सरनाईक) यांच्या कोळीवाड्याची व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता मोहिम संपन्न झाली.
परिसरात वाढलेली गवत, छोटी काटेरी झुडप काढण्यात आली. या
ठिकाणी अनेक अज्ञात वीरांच्या विरगळ, स्मृती स्मारक आहेत.
त्यांच्या आजू बाजूला वाढलेली गवत काढण्यात आली. तसेच जागृत श्री अमृतेश्वर
मंदिराच्या (Shree Amruteshwar Mandir) बाजून असलेला दगडी
बांध विस्कळीत झाला होता, तो बांध दगडी पुन्हा रचून
व्यवस्थित करण्यात आला. यामुळे संभाव्य अपघात टळणार आहेत.
याबाबत बोलताना गड किल्ले संवर्धन समितीचे साईनाथ जोशी (Sainath Joshi) सांगतात की,”येथे महादेव कोळी समाजाची वस्ती आहे. परंतु आता काहीजण गावात स्थलांतर
झाल्यामुळे मोजकी घरे या ठिकाणी आहेत. सुभेदार तानाजी मालूसरे सिंहगड किल्ला
जिंकण्यासाठी या ठिकाणी आले असता. तेथील परिसराची व गडाची माहिती काढण्यासाठी
त्यांनी कोळीवाड्यावर येऊन जागरण गोंधळ केला होता.”
या मोहिमेचे आयोजन गड किल्ले संवर्धन संस्थेचे सिंहगड विभाग प्रमुख
शांताराम लांघे (Gad Kille
Sanvardha Sanstheche Sinhagad Vibhag Pramukh Shantaram Langhe)
यांच्या माध्यमातून माजी पंचायत समिती सदस्य दत्ता जोरकर (Datta Jorkar), पंचमुखी हनुमान मंडळ (Panchamukhi Hanuman Mandal)
आणि दुरूकदराचे समस्त ग्रामस्थांचे सहकार्यातून पार पडले. तर गड किल्ले संवर्धन
समितीच्या पुढील स्वच्छता मोहिम समजण्यासाठी व संस्थेत सहभागी होण्यासाठी 77 44 013
012 या नंबरवर संपर्क करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84