Type Here to Get Search Results !

अँमनोरा पार्कच्या अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर इन्कम टॅक्सची रेड

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे (Aniruddha Deshpande) यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने पुण्यात 6 ठिकाणी छापेमारी (Income Tax Raid On Aniruddha Deshpande) केली असून यामध्ये देशपांडे यांच्या कार्यालयाचाही समावेश आहे. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याने आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या धाडसत्रातून काय निष्पन्न होणार, हे पहावे लागेल. (Income Tax Raid On Aniruddha Deshpande)

आयकर विभागाने मंगळवारी (दि. 14 फेब्रुवारी 2023) बीबीसी वृत्तसंस्थेच्या (BBC News) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयामध्ये सर्वेक्षण केले. यानंतर बुधवारी पुण्यातील बडे उद्योजक सिटी ग्रुपचे चेअरमन (Chairman of Citigroup) आणि अमनोरा पार्कचे (Amanora Park) सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर बुधवारी (दि. 15 फेब्रुवारी 2023) सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Pune News)

देशपांडे यांच्या कार्यालयासह घर आणि इतर ठिकाणी आयकर विभागाकडून तपासणी केली जात आहे. देशपांडे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. (IT Raid On Aniruddha Deshpande In Pune)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.