Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शहरातील अतिक्रमण अधिकारी (Encroachment Officials) आणि कर्मचारी खासगी लोकांची नेमणूक करून व्यावसायिकांकडून मनमानी पद्धतीने दंड (Fine) वसूल करतात, अशी तक्रार राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी (health minister) केली आहे. (pune news)
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी (दि. 6 फेब्रुवारी 2023) धनकवडी (Dhankawadi) येथील संभाजीनगर (Sambhaji nagar) येथील पदपथावर अतिक्रमण करून बेकायदा व्यवसाय करणार्यांवर कारवाई केली. या कारवाईत एक हातगाडी आणि एक टेम्पो जप्त (Confiscated) करण्यात आला. ही हातगाडी व टेम्पो सोडवण्यासाठी काही संघटनांच्या पदाधिकार्यांनी प्रयत्न केला. मात्र, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील (Dhnakawadi- Sahakarnagar Regional Office) अधिकार्यांनी दंड भरल्यानंतरच हातगाडी व टेम्पो सोडण्याचा पवित्रा घेतला.
त्यानंतर संबंधित पदाधिकार्याने राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांना घडलेला प्रकार सांगितला. सावंत यांनी फोनवरून क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्यास हातगाडी व टेम्पो सोडण्याची सूचना केली. तरीही अधिकारी ऐकत नसल्याने सावंत यांनी थेट धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयच गाठले. कारवाई करून जप्त केलेली हातगाडी आणि टेम्पो तत्काळ सोडून द्या, असे म्हणत सावंत यांनी अधिकार्यांना धारेवर धरले.
त्यावर कारवाई कायद्यानुसार असून, नियमानुसार दंड भरल्यावर ते सोडले जाईल, अशी भूमिका अधिकार्यांनी घेतली होती. त्यानंतर सावंत यांनी महापालिका आयुक्तांना फोन करून संबंधित अतिक्रमण निरीक्षकावर कारवाई करावी, त्याला निलंबित करावे, असे आदेश दिले. प्रशासन ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे समजताच दंडाचे दहा हजार रुपये भरून हातगाडी सोडवण्यात आली.
त्यानंतर सावंत यांनी अतिक्रमण अधिकारी आणि कर्मचारी स्वतः कारवाईसाठी न जाता खासगी लोकांना कारवाईसाठी पाठवतात, हे लोक मनमानी पद्धतीने दंड (Fine) वसूल करतात, अशी तक्रार महापालिका आयुक्तांकडे केली. सावंत यांनी केलेल्या तक्रारींची (Complaints) दखल घेऊन आयुक्तांनी दुसर्या दिवशी महापालिकेत बैठक घेऊन यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
“धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात घडलेल्या घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी केली जाणार आहे. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.” असे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Municipal Corporation Commissioner Vikram Kumar) म्हणाले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84