Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 20 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पाच वर्षांच्या नातीची इच्छा लक्षात घेऊन जन्मदात्या आईचा नैसर्गिक पालकत्वाचा हक्क फेटाळत न्यायालयाने नातीचा ताबा आणि पालकत्व आजी-आजोबांकडेच ठेवण्याचा निर्णय दिला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली (Additional District and Sessions Judge A. i. Perampally) यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. (pune news)
आई मुलीला आठवड्यातून एकदा भेटून व बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकते, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. हा निर्णय शुक्रवारी (दि. 20 फेब्रुवारी 2023) दिला गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील राहुल आणि टिना यांचे 2016 मध्ये लग्न झाले होते. 2018 मध्ये त्यांनी अंजली (सर्व नावे बदललेली) नावाची मुलगी झाली. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये राहुल यांचे निधन झाले. त्यामुळे टिना यांनी अमन यांच्याशी विवाह करीत पुन्हा वैवाहिक जीवनाची सुरुवात केली.
दुसरे लग्न करीत असताना टिना आणि तिच्या पहिल्या सासू-सासर्यांत समजुतीचा करारनामा (Memorandum of Understanding) झाला होता. ज्यामध्ये टिना यांनी स्वखुशीने अंजलीचा ताबा, देखरेख आणि पालकत्व तिच्या सासू-सासर्यांकडे दिले होते, असे आजी-आजोबांनी दाखल केलेल्या दाव्यात नमूद आहे.
करारनामा झाल्यावर काही महिन्यांनंतर टिना यांनी सासू-सासर्यांच्या विरोधात मुलीचा अनधिकृतपणे ताबा घेतल्याची तक्रार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात (Judicial Magistrate of First Class) दाखल केली. त्यावर न्यायालयाने टिना ही मुलीची जन्मदाती आई व नैसर्गिक पालक असल्याने अंजलीचा ताबा तिच्या आईला देण्याचा आदेश सासू-सासर्यांना दिला. (pune news)
या निकालाच्या विरोधात आजी-आजोबांनी अॅड. गंधार सोनीस (Adv. Gandhar Sonis) यांच्यामार्फत सत्र न्यायालयात धाव घेतली. मुलीचे पालकत्व, देखरेख तिचे पालन-पोषण आणि तिचा शैक्षणिक खर्च हे तिचे आजी-आजोबा करीत आहे. ते नैसर्गिक पालक नसले, तरी मुलीचा त्यांच्याकडे असलेला ताबा हा अनधिकृत आहे, असे म्हणता येणार नाही. मुलीच्या आईने ताबा मिळण्यासाठी केलेला दावा हे एक षड्यंत्र आहे, असा युक्तिवाद अॅड. सोनीस यांनी केला.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित पाच वर्षीय चिमुकलीशी संवाद साधला. या वेळी तिची काय इच्छा आहे. तिचे भवितव्य, हित आणि तिची मानसिकता लक्षात घेऊन सत्र न्यायालयाने मुलीचा ताबा तिच्या आईकडे देण्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल फेटाळून लावला व मुलीला तिच्या आजी-आजोबांकडे राहण्याची मागणी मान्य केली. (pune news)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84