Type Here to Get Search Results !

प्रहारच्या कार्यकर्त्याने सामान्य जनतेसाठी एका फोनवर बच्चू कडू आणि तानाजी सावंत यांनाही कामाला लावले

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): रस्त्यावर बेकायदा भाजी विक्रेची गाडी (Illegal vegetable vending cart on road) लावून व्यवसाय करणाऱ्यावर महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाने (Dhankawadi Regional Office) कारवाई करून 10 हजाराचा दंड (fine) ठोठावला. हा प्रकार आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांच्या कानावर येताच त्यांनी थेट क्षेत्रीय कार्यालय गाठून कारवाई करू नये अशी मागणी (demand) केली.

 

पण महापालिकेचे अधिकारी कारवाईवर ठाम राहिल्याने दंडाची रक्कम भरावी लागली. मात्र, त्यामुळे संतापलेल्या आरोग्यमंत्र्यांनी थेट महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. याप्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे (Encroachment Removal Department) अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. सोमवारी (दि. 6 फेब्रुवारी 2023) दुपारी एका भाजी विक्रेत्यावर कारवाई करून त्यास 10 हजार रुपयांचा दंड ठोठाण्यात आला. एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यांनी दंड कमी करावा म्हणून विनंती करुनही त्यास दाद दिली नाही. या भाजी विक्रेत्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या (Prahar Jan Shakti Party) संतोष साठे (Santosh sathe) यांना फोन करून घडलेला प्रकार कानावर घातला.

 

त्यांनीही तेथे येऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना समजून सांगितले. पण ते ऐकण्यास तयार नव्हते. साठे यांनी माजी राज्यमंत्री बच्चु कडू (Former Minister of State Bachu Kadu) यांना फोन करून हा प्रकार कानावर घातला. त्यावेळी कडू यांनीही अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून गाडी सोडून देण्यास सांगितले. तरीही अधिकाऱ्यांनी ऐकले नाही.

 

संतोष साठे यांनी त्यनंतर थेट राज्य आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना फोन करून हा प्रकार सांगितला. त्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा देखील केली. पण अधिकारी ऐकत नसल्याने पुढच्या पाच मिनिटात सावंत हे धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात पोहचले. अधिकाऱ्यांशी चर्चा करून एवढा दंड घेणे बरोबर नाही असे सुनावले तरीही अधिकारी ऐकत नसल्याने त्यांनी थेट आयुक्तांना फोन करून हा प्रकार कानावर घालून याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

 

त्यानुसार मंगळवारी आयुक्तांकडे यासंदर्भात बैठक (meeting) होणार आहे. आयुक्त विक्रम कुमार म्हणाले,”आरोग्य मंत्र्यांनी अतिक्रमण कारवाईसंदर्भात तक्रार केली आहे. यासंदर्भात मंगळवारी बैठक होणार आहे. याची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल.”

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.