Type Here to Get Search Results !

इलेक्ट्रिक डीपी’वर मांजा मध्ये अडकलेल्या घारीची पीएमपी फिटरने केली सुटका

 


पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मकरसंक्रांत जरी तोंड गोड करण्याचा सण असला तरी, दिवसेंदिवस वाढत असलेल्या पतंगबाजीमुळे मुक्या प्राणी पक्षांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पतंगाच्या चीनी मांजामध्ये अडकल्याने मुक्या जनावरांना जीवाला मुकण्याची वेळ येऊ लागली आहे. अशाच पद्धतीने इलेक्ट्रिक डीपी हाउसवर (Electric DP House) मांजा मध्ये अडकलेल्या घारीची (Black kite) पीएमपीएमएलच्या (PMPML) फिटरने सुटका करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. (pune news)

 

अमोल अनिल बराटे (Amol Anil Barate) असे त्या पीएमपीएमएलच्या फिटरचे नाव असून, बराटे हे पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन ईलेक्ट्रिक बस डेपो मधील ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बस मेंटेनन्स डिपार्टमेंट (Olectra Electric Bus Maintenance Deptartment) मध्ये काम करतात.

 

सकाळी सव्वा दहाच्या सुमारास काम करत असताना बराटे यांना तडफडणाऱ्या घारीचा आवाज आला. यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, डेपो मधील वरिष्ठ संकेत हनमंत डोंब (sanket hanmant domb) आणि पियुश विलास जाधव (piyush vilas jadhav) यांच्या सहकार्याने इलेक्ट्रिक डीपी हाउसवर शिडी लाऊन घारीची सुटका केली. अमोल बराटे यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.