Type Here to Get Search Results !

बीएमसीसी, एसपीसह नऊ महाविद्यालये, 'फिरोदिया करंडक'च्या अंतिम फेरीत

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (BMCC), सर परशुरामभाऊ महाविद्यालय (SP College), फर्ग्युसन महाविद्यालयासह (FC College) एकूण 9 महाविद्यालयांनी फिरोदिया करंडक स्पर्धेत (Firodiya Karandak Competition) अंतिम फेरीत धडक मारली. (Firodiya Karandak Result 2023)

स्पर्धेची अंतिम फेरी 25 आणि 26 फेब्रुवारीला रंगणार आहे. सामाजिक आर्थिक विकास संस्था स्वप्नभूमी (Samajik Arthik Vikas Sanstha Swapnabhumi) यांच्यातर्फे आयोजित फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेची प्राथमिक फेरी बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात (Annabhau Sathe Natygruha in Bibwewadi) झाली. फिरोदिया करंडक स्पर्धेचे यंदा 49वे वर्ष आहे.

स्पर्धेचे आयोजक अजिंक्य कुलकर्णी (Ajinkya Kulkarni), सूर्यकांत कुलकर्णी (Suryakant Kulkarni) या वेळी उपस्थित होते. दिग्दर्शक आदित्य इंगळे (Director Aditya Ingle), गिरीश दातार (Girish Datar), अनमोल भावे (Anmol Bhave), प्राजक्ता अत्रे (Prajakta Atre), देवेंद्र गायकवाड (Devendra Gaikwad) यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. प्राथमिक फेरीनंतर रात्री निकाल जाहीर करण्यात आला.

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पन्नासहून अधिक महाविद्यालयांनी सादरीकरण केले. प्राथमिक फेरीत झालेल्या सादरीकरणांतून डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (सांबरी), पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (मोहपाडा), बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (तुम बहते रहना), सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (रिवाज), महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजी (बंबई मेरी जान), जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय (उपज), सर परशुरामभाऊ महाविद्यालय (उबरमेन्च), राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (फिर मिलेंगे) आणि फर्ग्युसन महाविद्यालय (वगसम्राज्ञी) यांनी अंतिम फेरीत स्थान पटकावले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.