पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): एकीकडे उरुळी देवाची (uruli devachi) व फुरसुंगी (fursungi) या गावांची नवीन नगरपालिका (new municipal corporation) करू नका. आम्हाला पुणे महानगरपालिकाच हवी अशी मागणी, येथील ग्रामस्थांनी सुरु केली आहे. तर दुसरीकडे मात्र शिवणे (shivane), उत्तमनगर (uttamnagar), कोंढवे धावडे (kondhve dhawade) आणि न्यू कोपरे (new kopre) या गावांनी आमची स्वतंत्र नगरपालिका करा अशी मागणी केल्याचे पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार (Chief Minister Eknath Shinde Govt) काय निर्णय घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (pune news)
उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन्ही गावांची नवीन नगरपालिका
निर्मिती करण्याची घोषणा गेल्या दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
केली होती. या निर्णयामुळे या दोन्ही गावांत सुरू असलेली विकासकामे रखडण्याची
शक्यता आहे. त्यामुळे नवीन नगरपालिकेस दोन्ही गावातील बहुतांश ग्रामस्थांचा विरोध
असल्याचे उरुळी देवाची संघर्ष समितीचे सदस्य, माजी सरपंच उल्हास शेवाळे (Member of Uruli Devachi Sangharsh Samiti and Former Sarpanch Ulhas
Shewale) यांनी शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 पत्रकार परिषदेत (Press conference) सांगितले.
शेवाळे म्हणाले,”उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या दोन्ही गावांचा समावेश 2017 मध्ये पुणे महापालिकेत केला
होता. या दोन्ही गावांमध्ये महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत.
तसेच, नगर रचना योजनेच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही
गावांचा नियोजित विकास सुरू झाला होता. ही गावे महापालिकेतून वगळल्यास याचा
परिणाम विकास कामांवरही होणार. तसेच, नवीन नगरपालिका आल्यास कामे करण्याकरिता तीन ते चार वर्षांचा कालावधी
लागेल. त्यात येत्या काळात पूर्व भागाची नवीन महापालिका निर्माण झाल्यास पुन्हा
आमच्या गावांच्या नवीन महापालिकेत समावेश होणार. त्यामुळे राज्य सराकरने याकडे
लक्ष केंद्रित करून दोन्ही गावांना पुणे महापालिकेतच कायम ठेवून वाढीव कराचा
मुद्दा मार्गी लावावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. गावाच्या सर्वांगीण व सुनियोजित विकासासाठी
महापालिकाच हवी आहे.”
सरकारने याकडे दुर्लक्ष करत नगरपालिका निर्माण केल्यास तीव्र
आंदोलन करण्यात येईल, तसेच न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा ग्रामस्थांनी केला. याप्रसंगी विकास
भाडळे, राजेंद्र बाजारी, उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते, गणेश शेवाळे, जितेंद्र तिवारी आदी उपस्थित होते. एकूणच आता उरुळी देवाची व फुरसुंगी या
दोन्ही गावांच्या ग्रामस्थांचा विरोध आणि शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे आणि न्यू कोपरे या गावांकडून नगरपालिकेचे होत असलेले स्वागत
पाहता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार
आहे. त्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे (Shiv Sena Pune District Chief Ramesh Konde) यांची भूमिका देखील तितकीच महत्वाची ठरणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84