Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): टिकटॉक स्टार आणि लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami patil) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Socia Media) तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत असला तरी तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या डान्सवर महाराष्ट्रातून टीका केली जात असून अश्लील नृत्यावर बंदी घालावी, अशी मागणी देखील होत आहे. असे असले तरीही तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना दिसत आहे. (Gautami Patil News)
बहिरवाडी (Bahirwadi) येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी नृत्याला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला. मात्र काही तरुणांनी कार्यक्रमात धुडघुस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौतमी आणि आयोजकांना कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली. यानंतर गावच्या महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी हातात काठी घेत टवाळखोरांना दम देण्यास सुरुवात केली. यावेळी गावातील महिला तरुणांच्या गर्दीत घुसल्या आणि त्यांनी काठी उगारुन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि बंद पडलेला कार्यक्रम पुन्हा सुरु केला. (gautami patil in trouble)
एका व्हायरल व्हिडीओमुळे गौतमी पाटील रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तरुणाईमध्ये गौतमी पाटीलची खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. मध्यंतरी गौतमीच्या एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता. या सर्व प्रकारांमुळेच आता गौतमीच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. प्रतिभा शेलार (Pratibha Shelar) यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा कोर्टाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84