Type Here to Get Search Results !

हुतात्मा राजगुरु शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

 

पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राजगुरुनगर (Rajgurunagar) येथील हुतात्मा राजगुरु शाळेतील (Hutatma Rajguru School) विद्यार्थ्यांना दुपारच्या माध्यन्ह शालेय पोषण आहारातून विषबाधा (Food Poinsoning) झाली आहे. (pune news)

ही घटना (दि. 9 फेब्रुवारी 2023) रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. त्रास होणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थिनींना तातडीनं चांडोली (Chandoli Hospital)) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, हुतात्मा राजगुरु विद्यालयातील पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारतून दुपारी भात देण्यात आला होता. या भाताला साबणाचा उग्र वास येत होता. विद्यार्थ्यांनी तो खाल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी हा प्रकार सुरू झाला. शिक्षकांनी तत्काळ सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

शाळेतील सुमारे 53 मुलांना ही विषबाधा झाली. चांडोली रुग्णालयात विद्यार्थ्यांना तातडीने उपचार करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रुग्णालयात प्रांत विक्रांत चव्हाण (Vikrant Chavan), तहसीलदार वैशाली वाघमारे (Tehsildar Vaishali Waghmare), पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील (Police Sub Divisional Officer Sudarshan Patil), पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे (Police Inspector Rajkumar Kendra), प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पुनम चिखलीकर (Primary Health Center Medical Officer Poonam Chikhlikar) यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.