Type Here to Get Search Results !

कर्वेनगर मधील मिलेनियम शाळेवर कारवाई करा; विभागीय आयुक्तांचे आदेश

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर (Karvenagar) येथील मिलेनियम शाळेने (Millenium School) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE) संलग्नता मिळविण्यासाठी कर्वे समाज सेवा संस्थेच्या 30 एकर जागेची कागदपत्रे सादर करून ‘सर्टिफिकेट ऑफ लॅण्ड’ (Certificate Of Land) मिळविले आहे. या प्रकरणी पूर्वीचा आदेश रद्द करून कार्यवाही करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांनी दिला आहे. (pune news)

मिळालेल्या माहितीनुसार, मिलेनियम स्कूलने सीबीएसईची संलग्नता (CBSE Affiliation) मिळविण्यासाठी कर्वे संस्थेच्या जागेचा गैरवापर केल्याची तक्रार कर्वे समाज सेवा संस्थेने राज्य सरकारकडे (State Government) केली होती. कर्वे इन्स्टिट्यूटला मिळालेल्या जमिनीचा कर्वेनगर येथील मिलेनियम स्कूलकडून सीबीएसईच्या संलग्नतेसाठी दुरुपयोग केला असून शाळेवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी कर्वे संस्थेच्या सहाय्यक प्राध्यापक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन दिवाण (Chetan Dewan, assistant professor at Karve Sanstha and right to information activist) यांनी केली होती.

याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागविण्यात आली, त्यातून मिलेनियम शाळेने कर्वे संस्थेची जागा बेकायदा बळकावल्याची माहिती समोर आली. या जागेवर मिलेनियम स्कूलने बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमण (Illegal constructions and encroachments) केल्याचे दिवाण यांनी सांगितले. त्यानंतर संबंधित शाळेने कर्वे संस्थेच्या 30 एकर जागेची कागदपत्रे सादर करून सर्टिफिकेट ऑफ लॅण्ड मिळविल्याचे उघड झाले.

यासर्व बाबींची दखल घेऊन विभागीय आयुक्त राव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (Maharashtra Land Revenue Act 1966) च्या कलम 258 नुसार कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे 11 जानेवारी 2023 रोजी दिले आहेत.

“शाळेने कधीच कोणत्या जमिनीचा गैरवापर केलेला नाही. ज्या अटींवर जमीन देण्यात आली आहे, त्याप्रमाणेच जमिनीचा वापर शाळेने केला आहे. गेल्या 20-22 वर्षांत शाळेने कोणत्याही अटी, शर्थींचा भंग केलेला नाही. त्यामुळे शाळेवर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही, हे आरोप खोटे आहेत.” असे मिलेनियम नॅशनल स्कूलचे संचालक अन्वित फाटक (Anvit Phatak, Director, Millennium National School) म्हणाले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.