Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, katraj news)
पुणे, दि. 13 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): 'कात्रज विकास आघाडी'चे (katraj vikas aaghadi) प्रमुख नमेश बाबर (Namesh Babar) यांच्या मार्गदर्शनाखाली कात्रज येथील स्थानिक नागरिक कात्रज व पंचक्रोशीतील प्रश्नांबाबत प्रशासनाविरोधात रविवारी (दि. 12 फेब्रुवारी 2023) सकाळी कात्रज चौकात (Katraj Chowk) धिक्कार आंदोलन करण्यासाठी एकवटले होते. (katraj andolan news)
कात्रज (Katraj), अपर इंदिरानगर (Uppar Indiranagar), आंबेगाव (Ambegaon), मांगडेवाडी (Mnagdewadi) भिलारेवाडी (Bhilarewadi), गुजर निंबाळकरवाडी (Gujar Nimbalkarwadi), नव्याने समाविष्ट गावांमध्ये 24 तास अखंड वीजपुरवठा, कात्रजसाठी विद्युत उच्चदाब स्वतंत्र केंद्र, दररोज वेळेत मुबलक पाणीपुरवठा, मुस्लिमांच्या दफनभूमीचा प्रश्न, रस्ता, वाहतूक कोंडी, बीडीपी झोन (BDP Zone), नव्याने एकत्रित डीपीआर करण्यात यावा, अपर येथील गलिच्छ वस्ती निर्मूलन (गवनि) वसाहत प्रश्न अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी मांडल्या.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे (ShivSena shahar pramukh Pramodana Bhangire) यांनी आंदोलनस्थळी येत नमेश बाबर यांच्यामार्फत थेट मुख्यमंत्र्यांशी (CM Eknath Shinde) संपर्क साधत आंदोलनकर्त्यांच्या समस्या मांडल्या. बाबर यांनी कात्रज-कोंढवा रस्ता वाहतूक कोंडी (Katraj-Kondhwa road traffic jam), कात्रजकरांवर पालिकेने लादलेला तिहेरी टॅक्स (municipal tax), उड्डाणपूल, बीआरटी एकत्रित डीपीआर, खंडित वीज समस्या याबाबत प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले.
यावेळी माजी नगरसेविका अमृता बाबर (Former corporator Amrita Babar), माजी सरपंच दीपक गुजर (Former Sarpanch Deepak Gujar), अजित निंबाळकर (Ajit Nimbalkar), गणेश निंबाळकर (Ganesh Nimbalkar), विक्रम भिलारे (Vikram Bhilare), गणेश मोहिते (Ganesh Mohite), गोरक्ष मांगडे (Goraksha Mangde) यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आंदोलन ठिकाणी आले असता त्यांनी मागितलेल्या पाच एकर जमिनीबाबत कात्रज विकास आघाडीमार्फत पाच एकर जागा सुचवण्यात आली. लवकर वीज केंद्राच्या प्रश्न सुटेल असे सांगितले.
आंदोलानावेळी प्रमोदनाना भानगिरे आणि नमेश बाबर यांनी मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडली. यावेळी “कात्रज चौकातील वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न इतर समस्यांबाबत योग्य तो निर्णय घेऊ. कात्रजचे प्रश्न तातडीने सोडवू. त्याबाबत लेखी निवेदन पाठवा. कात्रज चौकात सध्या काम सुरू असलेला उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प, बीआरटी प्रकल्प, कात्रज दूध डेअरी ते मांगडेवाडी या सर्व प्रकल्पांचा एकत्रित डीपीआर, मुख्य चौकातील जड वाहतूक, वाहतूक कोंडीचा प्रश्न याबाबत बैठकीत निर्णय घेऊ,” असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवर सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84