Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): खडकवासला धरणाच्या (khadakwasla dam) सोनापूर (sonapur) परिसरात पाण्यात पुण्यातील दोन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघांनाही पोहता येत नव्हते, तरीही त्यांनी पाण्यात उतरण्याचा धाडसीपणा करून स्वत:चा जीव गमावला आहे. (pune news)
संबधित तरुण दारूच्या नशेत असताना पाण्यात उतरल्याची माहिती समोर आली आहे. फरहान अलिम शेख (Farhan Aleem Sheikh) (वय 18, रा. शिवतीर्थनगर, कोथरूड) आणि साहिल विलास ठाकर (Sahil Vilas Thacker) (वय 19, रा. शास्रीनगर, कोथरूड) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेनं कोथरूड (kothrud) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या फरहान व साहिल हे त्यांच्या मित्रांसोबत खडकवासला परिसरातील सोनापुर भागात फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी त्याठिकाणी मद्यपान देखील केले. त्यानंतर दारूच्या नशेत त्यांना पोहता येत नसतानाही फरहान आणि साहिल यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. मात्र, काही अंतर गेल्यावर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडू लागले. सोबत आलेल्या मित्रांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. (pune news)
त्यावेळी स्थानिक नागरिक गोरक्ष पवळे (Citizen Goraksh Pavle) यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होत स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. फिरण्यासाठी आलेले पाचही तरुण नशेत असल्याचे समोर आले असून दारूच्या नशेत ते तरुण पाण्यात उतरल्याचे समोर आले आहे. त्यातच त्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला आहे.
तसेच सोनापूर ग्रामपंचायतीकडून त्या ठिकाणी "पाण्यात उतरणे धोकादायक आहे. पाण्यात उतरू नका", असा बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे. तरीही हे तरूण येथे येऊन पाण्यात उतरले आणि आपला जीव गमावून बसले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84