Type Here to Get Search Results !

खेडशिवापूर टोल वसुलीचा ठेका ज्या राजकीय पक्षाच्या नेत्यांकडे असेल, त्यांना मतदान करू नका; खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे आवाहन

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर (Khed-shivapur) येथील टोलनाका (toll) हटविण्यासाठी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने (khed shivapur tolnaka hatav kruti samiti) पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. टोलनाका हटाव, या मागणीसाठी येत्या 1 मार्च 2023 रोजी समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम (Sanjay Kadam, Project Director, National Highways Authority) यांना समितीने बुधवारी (दि. 15 फेब्रुवारी 2023) दिले.

खेड शिवापूर येथील टोलनाका भोर तालुक्याच्या (Bhor district) हद्दीबाहेर हटविण्यात यावा, या मागणीसाठी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने दोन वर्षांपूर्वी आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनातील समितीच्या मागण्यांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. असे असताना स्थानिक नागरीकांनी टोलसाठी मासिक पास काढावा, असा निर्णय टोल प्रशासनाने घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर टोलनाका हटाव समिती आक्रमक झाली आहे. त्यानुसार खेड-शिवापूर टोलनाका भोर तालुक्याच्या हद्दीबाहेर हटवा, या समितीच्या मुख्य मागणीसाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. समितीने या निवेदनात ज्या मागण्या केल्या आहेत, त्या आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले. बाबत या निवेदनात विचारणा केली आहे.

खेड-शिवापूर टोलनाक्यावर स्थानिक टोल वसुलीचा ठेका ज्या राजकीय पक्षाच्या नेत्याकडे असेल, त्या राजकीय पक्षाला ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत मतदान करू नये, असे आवाहन यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी केले.

“टोलनाका हटाव ही आमची मुख्य मागणी आहे. मागील आंदोलनावेळी या मागणीवर कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा टोल हटाव, या आमच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माउली दारवटकर (Mauli Darwatkar convener of Khed-Shivapur toll road removal action committee) यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.