Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 20 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): दहा महिन्यांपासून बंद असलेला महापौर बंगला (Mahapaur bangla) आणि महापालिका आयुक्तांचा मॉडेल कॉलनी (model colony) येथील बंगला (palika aayukta bangla), या दोन्ही बंगल्यांच्या स्वच्छतेसाठी तब्बल 25 लाखांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. (pune news)
घोले रस्ता (ghole road) - शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून (shivajinagar regional office) महापौर बंगला तसेच पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या स्वच्छतेचे काम पाहिले जाते. त्यासाठी भांडार विभागाकडून विविध साहित्याची खरेदी केली जाते. ही खरेदी भांडार विभागाकडून करण्यासाठी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रस्ताव प्राप्त झाला. त्यानुसार भांडार विभागाने टेंडर प्रक्रिया राबवत ही खरेदी केली. महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली असून, या संबंधित सर्व खात्यांकडून खुलासा मागविला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेचा महापौर बंगला 15 मार्च 2022 पासून बंद आहे आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी 2022-23 या सालासाठी स्वच्छता विषयक सामग्री खरेदी करण्यात आले आहे. ज्यामध्ये सुगंधी तेल, ब्लॅक फिनेल, डांबर गोळी, फ्लोअर क्लीनर, कमोड घासण्याचा ब्रश, काच पुसण्याची नॅपकिन, चहाचा कप, चहा ट्रे, रूम फ्रेशनर अशा विविध 30 साहित्याचा समावेश आहे. (pune news)
यासाठी 24 लाख 59 हजाराचा खर्च करण्यात आला आहे. या बाबीची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनाही दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित अतिरिक्त आयुक्त, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय आणि आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी (Administration Officer in the Office of the Commissioner) यांच्याकडून खुलासा मागितला आहे. याचे कारण असे कि, महापालिका सदस्यांची मुदत संपल्याने हा बंगला प्रशासनाने ताब्यात घेतला असून, तेथे कोणीही राहत नाही. तरीही त्याच्या स्वच्छतेसाठी साहित्य खरेदी करण्यात आली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84