Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राज्यात एकीकडे बेरोजगारी (unemployment), शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना मनसेनं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांच्याकडे राज्यात कॅसिनो (Casino) सुरू करण्याची मागणी केली आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यातील पर्यटन (tourism), एंटरटेन्टमेन्ट (entertainment) आणि गेमिंग क्षेत्राला (gaming zone) चालना देऊन रोजगार तसंच महसूल वाढीसाठी गेमिंग झोनला परवानगी देण्यासाठी मनसेचे कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण (MNS Workers Sena President Manoj Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये राज्यात कॅसिनो सुरू करावा अशी मागणीच केली आहे.
अमेरिका (America), मलेशिया (Malasiya), थायलंड (Thailand), मकाऊ (Macau) सारख्या आंतरराष्ट्रीय देशात आणि गोव्यात मोठ्या प्रमाणात कॅसिनो-गेमिंगला परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन उद्योगाचा विकास झाला आहे. गोवा (Goa) राज्यात ऑफशोअर (Offshore Casino) 6 कॅसिनो आणि ऑनशोअर (Onshore Casino) 8 कॅसिनो आहेत. सिक्कीममध्येही (Sikkim) पंचतारांकित हॉटेलमध्ये परवानगी दिली आहे. पण आपल्याकडे कॅसिनो-गेमिंगबाबातच्या बुरसटलेल्या विचारांमुळे आपल्याच राज्यात विधिमंडळात पारित केलेला महाराष्ट्र कॅसिनोज (नियंत्रण आणि कर) अधिनियम हा कायदा 1976 पासून धूळखात पडला आहे. पण, याबद्दल अधिसूचना काढलेले नाही. 10 मे 2022 रोजी पर्यटन संचालनालयाचे सचिव प्रधान सचिवांनी अभ्यासगट स्थापन करून गोवा, सिक्कीम, मकाऊ आणि नेपाळमध्ये (Nepal) कॅसिनोची पाहणी केली होती पण पुढे काहीही झालं नाही, असा दावाही करण्यात आला आहे.
2018-19 मध्ये गोव्याला कॅसिनो आणि गेमिंगमधून 411 कोटींचा महसूल मिळाला होता. अमेरिकेतील ग्लोबल मार्केट अॅडवहायजर्स या अर्थविषयक संशोधनानुसार, महाराष्ट्रात जर कॅसिनो सुरू केले तर 1.1 बिलियन अमेरिकन डॉलर्स महसूल मिळेल. तसंच कॅसिनो गेमिंगवर 28 टक्के जीएसटीमुळे सरकारला जीएसटीही मिळेल, असा दावाही मनसेनं केला आहे.
त्यामुळे मुंबई (Mumbai), लोणावळा (Lonavala), लवासा (Lavasa), महाबळेश्वर (Mahabaleshwar), अलिबाग (Alibaug) अशा पर्यटनस्थळी आणि कोकणाच्या किनारपट्टीवर कॅसिनोला परवानगी द्यावी, अशी मागणीच मनसेनं केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84