Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): चंदनाच्या वृक्षांची (Sandalwood trees) चोरी होण्याची भीती आहे आणि त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने तब्बल 60 वृक्ष तोडण्याची परवानगी द्यावी, अशी अजब मागणी कोंढवा (Kondhwa) येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकने (एनआयबीएम – NIBM Pune) महापालिकेकडे (Pune Municipal Corporation - PMC) केली आहे. (Pune News)
एनआयबीएमच्या आवारातील कार्यालय आणि वसतिगृहात चंदनाचे 60 वृक्ष आहेत. या वृक्षांची चोरी होत असल्याने ते काढण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव नोव्हेंबर (November) महिन्यात महापालिकेच्या हडपसर-कोंढवा क्षेत्रीय कार्यालयाकडे (Hadapsar Kondhwa Regional Office) आला होता. आश्चर्य म्हणजे पालिकेनेही परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मिळालेल्या प्रस्तावावर क्षेत्रीय कार्यालयाने लगेचच तत्परता दाखविली.
या चंदनाच्या वृक्षांमुळे जीवित आणि वित्तहानी (financial loss) होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अटी-शर्तीनुसार स्थानिक जातीचे 929 वृक्ष लावण्याच्या अटीवर पूर्णपणे हे वृक्ष काढण्याची आवश्यकता असल्याचा सकारात्मक अभिप्राय दिला आहे. एनआयबीएम आणि महापालिका या दोघांनीही आता केवळ चोरी होतेय म्हणून हे वृक्ष काढण्याचा पवित्रा घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुळातच या वृक्षांची चोरी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असताना थेट वृक्ष काढून टाकणे हा अखेरचा पर्याय असू शकतो का?, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या प्रस्तावास परवानगी मिळाल्यास असे चंदनाचे वृक्ष काढण्याचे अनेक प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा कोणताही विचार प्रशासनाकडून केलेला नाही.
या 60 वृक्षांतून काही लाखांचे चंदन मिळणार असल्यामुळे या तोडलेल्या वृक्षांचा लिलाव करणार की आणखी काय, हा प्रश्न निरुत्तर आहे. त्यावर हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रसाद काटकर (Assistant Commissioner of Hadapsar-Mundhwa Zonal Office Prasad Katkar) यांनी हे वृक्ष काढण्यास परवानगी मिळाल्यास त्या वृक्षांचे मूल्यांकन करून रक्कम ठेकेदाराकडून आपल्या कोषागारात भरून घेणार किंवा त्यांचा लिलाव करणार का याबाबत एनआयबीएमला हमीपत्र सादर करण्यास सांगितले आहे.
“चोरी होतेय म्हणून चंदनाचे वृक्ष काढण्याची परवानगी म्हणजे अजबच प्रकार आहे. त्यापेक्षा चोरी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे आणि महापालिकेनेही तशीच भूमिका घेण्याची आवश्यता आहे. हा प्रस्तावच शंकास्पद आहे. हे वृक्ष तोडण्याची परवानगी दिल्यास त्याविरोधात आम्ही वृक्षप्रेमी आवाज उठवू.” असे निसर्ग अभ्यासक नंदू कुलकर्णी (Naturalist Nandu Kulkarni) म्हणाले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब
करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84