Type Here to Get Search Results !

गोल्डमॅनची किडनी निकामी झाली; सोन्याचा शर्ट देखील सापडेना

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

 

पुणे, दि. 13 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आपल्या वाढदिवसाला सोन्याचा शर्ट खरेदी करत तो परिधान केल्याने संपूर्ण महाराष्ट्रसह जगभरात (Maharashtra Police) येवल्यातील (Yeola) पंकज पारख (Goldenman Pankaj Parakh) चर्चेत आले होते. (pankaj parakh gold shirt)

काही वर्षांपासून पंकज पारख यांची गोल्डमॅन म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे हा पंकज पारख येवला नगरपरिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे. (Former mayor of the Municipality of Yeola, Pankaj subhash Parakh) त्यामुळे पंकज पारख यांचे राजकीय संबंध आणि व्यावसायिक क्षेत्रात असलेले संबंध पाहता पंकज पारख याला अटक झाल्यावर अनेकांच्या भुवया उंचवायला आहे. नुकतीच दहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी (Nashik Police) न्यायालयाने दिली आहे.

नाशिकच्या येवला येथील सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्थेचा पंकज पारख हा संस्थापक-संचालक होता. (Subhash Chandra Parakh Urban Co-operative Credit Institution) त्यामध्ये पारख याच्यासह इतर 17 संचालकांवर अपहाराचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पंकज पारख हा फरार होता. 14 महीने झाले तरी पंकज पारख हा पोलिसांना सापडत नव्हता, नाशिकच्या ग्रामीण पोलिसांचे (Nashik Rural Police) पथक पंकज पारखच्या मागावर होते. पंकज पारख हा काळ्या काचेच्या गाडीतून तिडके कॉलनी परिसरात (Tikde Colony Area) बाहेर चालला होता, मात्र पोलिसांना माहिती मिळताच पोलीसांनी त्याला सापळा रचून अटक केली होती.

पोलीसांनी अटक केल्यानंतर पंकज पारख यांच्या घरातील मालमत्तांची कागदपत्रे पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. मात्र, तब्बल दीड कोटी रुपयांचा शर्ट कुठे आहे याबाबत अद्यापही माहिती मिळत नाहीये. पारख याच्याकडून हा शर्ट विक्री केला गेला आहे याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, तो शर्ट कुणाला विक्री केला आहे, किती पैशांना विक्री केला आहे, त्या शर्ट खरेदी करणारा व्यक्ती कोण आहे? याबाबत माहिती पारख देत नाहीये.

पंकज पारख कारवाई दरम्यान सहकार्य करीत नसल्याचेही बोललं जात आहे. याबाबतचा दावा सुनावणी दरम्यान करण्यात आला आहे. बँकेच्या संबंधित जवळपास 93 कागदपत्रे पारखने लपविल्याचा अंदाज आहे. पारख याच्या अशा भूमिकेमुळे पोलीसांसमोर अडचणी निर्माण होत आहे. नुकतीच त्याची दहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत आता कसून तपास सुरू केला आहे.

येवल्याचा माजी नगराध्यक्ष आणि सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष पंकज पारख याची एक किडनी निकामी (Goldenman Pankaj Parakh kidney failed) असल्याची माहिती समोर आली आहे. गोल्डमॅनची यापूर्वीच एक किडनी निकामी असल्याची वैद्यकीय तपासणी दरम्यान समोर आले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.