Type Here to Get Search Results !

गोलमाल है भाई सब गोलमाल है; पुणे महानगरपालिकेची १० वाहनतळे एकाच ठेकेदारास चालवायला दिली


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कात्रज (katraj) येथील वाहनतळावर (parking lot) महापालिकेने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन लूट करणाऱ्या ठेकेदाराचे (contractor) काम काढून घेण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रकल्प विभागाने घेतला आहे. (pune news)

 

पुणे महापालिकेने (pune mahanagar palika) वाहनतळ चालविण्यासाठी निविदा काढली होती. त्यामध्ये कात्रजसह शहरातील 10 वाहनतळ एकाच ठेकेदारास दिले आहेत. महापालिकेने प्रत्येक वाहनतळासाठी दुचाकी, चारचाकीला प्रतितास किती शुल्क (price per hour) घ्यावे हे निश्‍चीत केले आहे. शुल्क जास्त घेतल्याची तक्रार आल्यास पहिल्या दोन तक्रारींसाठी दंडात्मक कारवाई तर तिसऱ्या तक्रारीनंतर थेट निविदा रद्द करून बँक गॅरंटी जप्त केली जाते.

 

गेल्या महिन्यात महात्मा फुले मंडईतील आर्यन वाहनतळ (mahatma phule mandai pune aaryan parking lot) ठेकेदारास चालविण्यास देण्यात आले आहे. या ठेकेदाराने 45 मिनिटांसाठी 10 रुपये आॅनलाइन शुल्क (online payment) घेतल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली. तसेच तक्रारदाराने लूट सुरू असल्याचा प्रकार चेकमेट टाईम्सच्या (Checkmate Times) निदर्शनास आणून दिला. याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता या ठेकेदारास पहिली नोटीस व 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, असे सांगितले. या ठेकेदारावर यापूर्वी दोन वेळा कारवाई करून प्रत्येकी 3 हजार आणि 5 हजार रुपयांचा दंड केला आहे. तरीही वाहनतळावर नागरिकांची लूट सुरूच होती. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या ठेकेदाराकडे 10 वाहनतळाचे काम आहे. त्यासाठी वर्षाला सुमारे 73 लाख रुपये रक्कम महापालिकेला भरावी लागणार आहे. या रकमेच्या 20 टक्के रक्कम ही बँक गॅरंटी (bank guarantee) ठेवावी लागते. महापालिकेने केलेल्या करारानुसार ठेकेदाराने कराराचे उल्लंघन केल्यास निविदा रद्द केल्यानंतर गॅरंटींही जप्त केली जाते. त्यानुसार या ठेकेदाराची 14 लाख रुपयांची रक्कम जप्त केली जाणार आहे.

 

कात्रज येथे राजीव गांधी प्राणी संग्रहालय (Rajiv Gandhi Zoological Museum) येथे गेल्या आठवड्यात नागरिकांकडून ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे घेण्यात आले. शिवाय वाहनतळाच्या बाहेर पादचारी मार्गावर गाडी लावली तरीही नागरिकांकडून ठेकेदाराने पैसे घेतल्याच्या तक्रारी प्रकल्प विभागाकडे आलेल्या होत्या.

 

“कात्रज येथील वाहनतळाच्या ठेकेदारा विरोधात यापूर्वीही तक्रारी आल्या आहेत. यामध्ये कराराचे उल्लंघन झाल्याने निविदा रद्द करून बँक गॅरंटी जप्त केली जाईल.” असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Additional Commissioner Dr. Kunal Khemnar) म्हणाले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.