Type Here to Get Search Results !

उद्यापासून राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी; प्राथमिक शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 14 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी (Maharashtra Primary Teachers Asoociation Ratnagiri Conference) राज्य शासनाने 15 ते 17 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा (Holiday) शिक्षकांना मंजूर केली आहे. (School holidays for 5 consecutive days)

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (Maharashtra State Primary Teachers Union) राज्यातील सर्वात मोठी शिक्षक संघटना आहे. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचे राज्यभरात दोन लाखाहून अधिक सभासद आहेत. शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनावेळी बहुसंख्य शिक्षक उपस्थित राहणार असल्याने राज्यातील शाळा यावेळी बंद राहणार आहेत. या मंजुरीमुळे राज्यातील शिक्षकांना यामुळे शनिवार व रविवारच्या सुट्टीला जोडून एकत्रित पाच दिवसांची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे (Balasaheb Marne, District President of Teachers Union) यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद रत्नागिरी येथील चंपक मैदानावर 17 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde), राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Party President Sharad Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar), ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan), विरोधी पक्ष नेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar), उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक जण उपस्थित राहणार आहेत.

राज्य शासनाने या अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांसाठी 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा मंजूर केली आहे. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री (mahashivratri) व 19 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग पाच दिवसांची सुट्टी राज्यातील शिक्षकांना मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातून रत्नागिरी येथील अधिवेशनासाठी 10 हजार हून अधिक सभासदांनी नोंदणी केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme), सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी (Pay Errors in Seventh Pay Commission), समाजशास्त्र शिक्षकांना संरक्षण, जुन्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीमध्ये वाढीव संधी, विनाअट घरभाडेभत्ता (Unconditional house rent allowance), महापालिका वाढीव हद्दीतील शाळांचे शिक्षकांसह वर्गीकरण (Classification of schools in municipal extension limits with teachers), एम एस सी आय टी मुदतवाढ (MSCIT Extension), शिक्षण सेवक भरती, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती यांसह अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे (General Secretary Khanderao Dhole) यांनी दिली.

शिक्षक संघाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत, शिक्षकांच्या विशेष रजेसाठी शालेय शिक्षण, ग्रामविकास व नगरविकास विभागास खुद्द मुख्यमंत्री कार्यालयातून निर्देश दिले गेले आहेत. यामुळे प्रत्यक्ष अधिवेशनात शिक्षकांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या घोषणा करतात याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.