Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज (Sadguru Mata Sudikshaji Maharaj) यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच जेजुरी (pune zone jejuri branch) येथे संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा (Social wing of Sant Nirankari Mission), संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा (Sant Nirankari Charitable Foundation) विशाल रक्तदान शिबिराचे (Blood donation camp) आयोजन 15 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले. यामध्ये 80 श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. यामध्ये ससून रक्तपेढी पुणे यांनी 80 युनिट रक्त संकलन केले. (pune news)
या शिबिराचे उदघाटन विनाताई हेमंत सोनवणे (Jejuri Municipality Mayor Vinatai Hemant Sonawane) (नगराध्यक्ष जेजुरी नगरपालिका) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले (Officer Charudatta Ingole), रुक्मिनी जगताप (नगरसेविका) (corporator Rukmini Jagtap) तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली (Delhi) येथे नोव्हेंबर 1986 मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज (Baba Hardev Singhji Maharaj) यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील 36 वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत 7474 रक्तदान शिबीर संपन्न झाली असून 12,32,419 युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे.’ संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान (Cleanliness campaign), वृक्षारोपण (Tree Plantation), निशुल्क आरोग्य तपासणी (Free Health Checkup), नेत्र चिकित्सा शिबीर (Ophthalmology Camp) तसेच महिला सशक्तीकरण (Women Empowerment), बाल-विकास (child-development), नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता (Assistance during natural calamities) यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार विलासकाका रासकर (Vilaskaka Raskar) (नानगाव सेक्टरप्रमुख) भारती ताई घोरपडे (Bharti Tai Ghorpade), दादा थोरात (Dada Thorat) यांनी केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84