Type Here to Get Search Results !

स्वराज्याचे शिलेदार यांना सिंहगडावर सापडला 3740 प्लास्टीक व 42 दारूच्या बाटल्यांचा खजिना

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 20 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): इतिहासाबद्दल असलेले प्रेम केवळ भावनिक न ठेवता योग्य कृतीची जोड देवून नव्या वाटा शोधणारे तरुण म्हणून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानने (Shiledar Pratishthan) आपले वेगळेपण जपले आहे. ऐतिहासिक वास्तू, पाणी संवर्धन, वीरगळ संवर्धन, विहिरीचे पुनरुज्जीविकरण, प्राचीन अवशेष असलेल्या जागाची साफ करून आपल्या इतिहासाचा ठेवा जपण्याचे काम प्रतिष्ठान करत आहे. नुकतेच प्रतिष्ठान मधील तरुणाने सर्वात मोठी प्लास्टीक मुक्त मोहीम (plastic free campaign) सिंहगडावर (sinhagad) राबविण्यात आली होती.

सकाळी लवकर जाऊन प्रतिष्ठानच्या युवकांनी कर्वेनगर (karvenagar) मधील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना स्वच्छ पुसून हार घालून मानवंदना देऊन शिवकार्य स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य घेवून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे शिलेदारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा देवून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

सिंहगड किल्ल्यावरील (sinhagad fort) खंद कडा, कल्याण दरवाजा, झुंजार बुरुज, स्मारकाच्या भोवतालचा परिसर, कल्याण दरवाजा ते चोर वाट या खालच्या भागातील सर्व प्लास्टीक बाटल्या (plastic bottle) गोळा करण्यात आल्या. सर्व प्लॅस्टिक व दारूच्या बाटल्या (wine bottles) एकत्र करून 6 तासाच्या अथक परिश्रमानंतर नरवीर तानाजी मालुसरे (Narveer Tanaji Malusare) यांच्या बलिदानामुळे पावन झालेल्या स्मारक समोर ठेवण्यात आल्या.

“सुभेदार....

माफी असावी क्षमा असावी..

हाच इतिहास (कचऱ्याच्या) आम्ही पुढील पिढीला प्रेरणा देणारा म्हणून सांगणार आहोत का..

कधी कळणार आम्हास, आम्ही चुकतोय तरी आम्ही कचरा करतोय.....

ना वाजवतो ना गाजवतो ना नाचवतो आम्ही महाराजांचा इतिहास आम्ही जपणार भावी पिढीसाठी..

संवर्धन हीच आमची जात आणि हाच आमचा धर्म”


शिवकार्य ची सांगता ही नुकतेच राज्य गीत गर्जा महाराष्ट्र व शिवघोष करून करण्यात आली. त्यांनतर भोजन करून पुढच्या राहिलेल्या गड स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले.

प्रतिष्ठानचे शिलेदार मंगेश नवघणे (shiledar pratishthan Mangesh Navghane) म्हणाले,”सिंहगड हा किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या त्यागाचा, प्रेरणादायी विचारांचा आहे. किल्यावर वाढलेले पर्यटन व व्यवसाय मुळे किल्ल्याची कचरा कुंडी झाली आहे. ती दिवसेंदिवस वाढतच आहे. सिंहगड किल्ल्यावर वन विभागाने प्लॅस्टिक बंदी ही गडाचे सौदर्य खुलविण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केली पण तशी बंदी 2008 पासून च आहे पण ती मात्र तिथल्या फलकावर च आहे. पुन्हा गेल्या नोव्हेंबर महिन्यात प्लास्टीक बंदी व दारू बंदी अगोदर असल्याने तरी सुद्धा दोन्ही कचरा सिंहगड किल्ल्यावर फार मोठ्या प्रमाणात सापडतो. त्यावर 100 ते 500 दंड असून सुध्धा त्याची अंमलबजावणी होत नाही ही मोठी शोंकतिका आहे.”

पुढे ते म्हणाले,”गडावर 150 पेक्षा पाण्याच्या टाक्या आहेत. त्याची निगा राखून त्यात नळ द्वारे पाण्याची सोय होऊ शकते.किंवा देवगिरी व वासोटा किल्ल्याच्या धर्तीवर सिंहगड किल्ल्यावर योजना राबविण्यात यावी. काही हॉटेल व्यावसायिक बाटल्या व इतर कचरा वर घेवून येतात मात्र तेच खाली घेवून जात नाही तोच कचरा आज ही टाक्यात व बुरूजाखाली टाकला जातो..तसेच टोल घेतला जातो मात्र तिथे तपासणी न करता दारूच्या बाटल्या गडावर  आढळतात. पर्यटक सोबतच वन खाते व हॉटेल व्यवसायिक दोषी आहेत...सर्वांशी त्वरित पत्र व्यवहार करून कडकं प्लॅस्टिक बंदी करण्यात यावी नाहीतर प्रतिष्ठान तर्फे फलक बाजी व आंदोलन करण्यात येईल.”

या मोहिमेत आरव शिंदे, सुशांत साळवी, स्वहित कळंबटे, स्वराज कळंबटे, सूरज कांबळे, भारत रेणुसे, सुयश सावंत, अनिल कडू, रमेश ढोकळे, अक्षय तेटंबे, अभिजीत शिंदे, मंगेश नवघणे, सागर फाटक, परशुराम धूर्वी, केतन महामुनी, संतोष वरक सहभागी झाले होते. या मोहिमेचे नियोजन रमेश ढोकळे यांनी केले होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.