Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शासनच्या आरोग्य चित्रपट महोत्सवात 'तडा' लघुपटाला मानांकन प्राप्त



Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 21 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): विशाल सिरसट (Vishal sirsat) व सचिन मोरे (Sachin More) दिग्दर्शित नवोदित अभिनेता विजय जायभाये (Actor Vijay Jayabhay) मुख्य भूमिकेत असलेल्या तडा व शेतकरी या लघुपटांना नुकताच सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनच्या (Department of Public Health Government of Maharashtra) 'महा आरोग्य फिल्म फेस्टिवल 2022-23 महोत्सवा’त (Maha Arogya Film Festival 2022-23) मानांकन जाहीर झाले.

‘तडा’ (shortfilm ‘Tada’) या लघुपटाद्वारे एका वेगळ्या परंतु आपल्या आजूबाजूला घडणा-या विषयाची मांडणी केली आहे. हा लघुपट एका विशिष्ट विचारधारेला भेद देणारा आणि समाजाला दिशादर्शक ठरणारा आहे. याचीच दखल घेत या महोत्सवात मानांकन जाहीर झाले आहे.

तडा या लघुपटाद्वारे लेखक, कवी विजय जायभाये, मधुकर सुतार (Madhukar Sutar), पायल पालवे (Payal Palve) हे नवोदित कलाकार आपल्याला अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसतात. या नवोदितांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर विशाल सिरसट लिखित तडा या कथेला योग्य तो न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आहे. त्याच बळावर अतिशय अल्पावधीत तडा हा लघुपट वेगवेगळ्या स्तरावर यश संपादन करताना पहायला मिळत आहे. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.

तडा या लघुपटाचे रंगभूषाकार व वेशभूषाकार (Makeup artist and costume designer) कोमल नितीन शिखरे (Komal Nitin Shikhar), संकलन, चित्रीकरण, छायांकन व संगीत सचिन मोरे (Compilation, cinematography, cinematography and music by Sachin More), निर्माता विशाल नामदेव सिरसट (Producer Vishal Namdev Sirsat) तसेच द वैयक्तिक प्रोडक्शन निर्मिती पप्पू पानझाडे (Pappu Panzade) चित्रपट क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.