Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): माघनवमी (Maghnavami) ही नरवीर तानाजी मालुसरे (Narvir Tanaji Malusare) यांची 353वी पुण्यतिथी (Death Anniversary) असून याच दिवशी त्यांनी सिंहगड किल्ला (Sinhagad Fort) जिंकला. परंतु त्यांना वीरमरण आले. (Pune News)
मुलाचं लग्न उघड्यावर टाकून "आधी लगीन कोंढाण्याचं मग माज्या रायबाचं" असं म्हणत तानाजी मालुसरे उदयभान राठोड (Udaybhan Rathod) नावाच्या किल्लेदारावर धाऊन गेले. घनघोर युद्धात तानाजी मालुसरे यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे (Suryaji Malusare) वयानं जेष्ठ शेलार मामा (Shelar Mama) व अन्य मावळ्यांनी गड ताब्यात घेतला मात्र शिवरायांचा बालमित्र अन मराठी मूलकाचा सिंह धारातीर्थी पडला. याच प्रसंगामुळे कोंढाणा किल्याला ‘सिंहगड’ असे नाव पडले.
जो कडा सर करून तानाजी अष्टमीच्या रात्री किल्ल्यावर गेले होते. त्याच काळोख्या रात्री हा कडा सर करून सिंहगडावर जाऊन त्यांना अनोखी मानवंदना देण्याचे पुण्यातील 7 गिर्यारोहकांनी (Mountaineer) ठरवले. आज आपण ज्याला तानाजीकडा म्हणून ओळखतो, तोच कडा अष्टमीच्या रात्री 11 वाजता चढण्यास सुरु केला सलग सहा तास चढाई करून पहाटे 5 वाजता हे गिर्यारोहक किल्ल्यावर पोहोचले. सुमारे 350 वर्षांपुर्वीचा इतिहास त्याचप्रकारे अनुभवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. रात्रीच्या अंधारात कडा सर करण्याची जोखीम अधिक असते.
एस एल एडव्हेंचरचे प्रमुख लहू उघडे (SL Adventure Chief Lahu Ughade) यांच्या नेतृत्वाखाली कसलेले गिर्यारोहक कृष्णा मरगळे (Krushna Margale), तुषार दिघे (Tushar Dighe), मानसिंह चव्हाण (Mansingh Chavhan), मंगेश सांबरे (Mahesh Sambare), शैलेश थोरवे (Shailesh Thorve), प्रसाद बागवे (Prasad Bagve), युवराज गटक्कल (Yuvraj Gatakkal), विनोद गायकवाड (Vinod Gaikwad) यांनी ही मोहीम यशस्वी करून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना अनोखी मानवंदना दिली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84