Type Here to Get Search Results !

अखेर फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे वगळण्याचा ठराव मान्य; नगर परिषद होण्याचा मार्ग मोकळा

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, fursungi, urali devachi news)

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राज्य सरकारच्या आदेशांनुसार फुरसंगी (fursungi) आणि उरुळी देवाची (uruli devachi) ही गावे वगळण्याचा ठराव महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार (Municipal Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी शहर सुधारणा समितीमध्ये (City Improvement Committee) मान्य केला. हा ठराव (Rsolution) बुधवारी (दि. 8 फेब्रुवारी 2023) मान्य केला गेला.

हा ठराव खास सर्वसाधारण सभेत मान्य केल्यानंतर राज्य सरकारला (State Government) पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून त्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावरील हरकती सूचनानंतर या गावांची स्वतंत्र नगर परिषद (Independent Municipal Council) निर्माण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला आहे.

त्यानुसार ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव करावा आणि तो ठराव राज्य सरकारला पाठविण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचे प्रशासक विक्रमकुमार यांनी शहर सुधारणा समितीत या ठरावास मान्यता दिली आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची या ठिकाणी असलेल्या कचरा डेपोच्या जागेशिवाय ही गावे महापालिकेतून वगळण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाने ही गावे महापालिकेतून वगळू नये, अशी भूमिका व्यक्त केली होती. महापालिकेने या गावांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. त्यातच या गावांचा विकास आराखडा तयार झाला असून, तो लवकरच सर्वसाधारण सभेला सादर करण्यात येणार आहे. या गावांमध्ये नागरी सेवा सुविधांसाठी लागणारी आरक्षणे; तसेच रस्त्यांच्या जाळ्याचा अभाव आहे. या गावांमध्ये नागरिकरणाचा वेग झपाट्याने असून गुंठेवारी स्वरूपाची बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहे. ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर तीन प्रारूप नगर रचना, प्रारूप विकास आराखडा, रस्ते, पाणी पुरवठा वाहिन्या, जलशुद्धीकरण प्रकल्प, मलनिस्सारण योजना वाहिन्या, शैक्षणिक व आरोग्य विषयक सुविधा देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ही गावे महापालिकेतून वगळू नयेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

गावे महापालिकेत समाविष्ट करावी, यासाठी सन 2013 मध्ये सर्वसाधारण सभेने ठराव केला होता. हा ठराव राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. महापालिकेत गावांचा समावेश व्हावा, यासाठी उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून ही गावे टप्प्याटप्प्याने महापालिकेत समाविष्ट करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या दोन गावांची नगर परिषद निर्माण करताना या तांत्रिक अडचणींचा सामना सरकारला करावा लागणार आहे. ही गावे महापालिकेतून वगळू नयेत, यासाठी स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.