Type Here to Get Search Results !

विजय वडवेराव यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आनंददायी वाचन प्रकल्प अंतर्गत, भारती विद्यापीठाच्या (Bharati Vidyapeeth) सौ. विजयमाला कदम कन्या प्रशालेत (Vijaymala Kadam Kanya Parshala) शंकरराव मोरे विद्यालयातील (Shankarrao More Vidyalay) माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष विजय वडवेराव (Alumni Union President Vijay Vadverao) यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप (Distribution of educational materials) करण्यात आले. (pune news)

भारती विद्यापीठाचे शालेय विभागाचे संचालक व आनंददायी वाचन प्रकल्पाचे समन्वयक विजय वडवेराव यांच्या स्वखर्चातून प्रशालेतील विद्यार्थ्यांना जेवणाचे स्टीलचे डबे, वह्या, बालमित्र उजळणी इत्यादी शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा मनोदय केला. मी सामान्य कुटुंबातील असून मला शैक्षणिक काळात ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या या विद्यार्थ्यांना येऊ नयेत, म्हणून मी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनीच्या शैक्षणिक गरजा सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वडवेराव यांनी यावेळी सांगितले.

लेखन वाचन प्रकल्पाला विद्यार्थी उत्तम प्रतिसाद देत असल्याने, संचालक एम. डी. कदम (Director M. D. Kadam) यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका विद्या जाधव (School Principal Vidya Jadhav), उपमुख्याध्यापक पी जी डवंग (Vice Principal P G Dawang), पर्यवेक्षक व्हि बी सावंत (Supervisor V B Sawant) उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.