Type Here to Get Search Results !

गोकुळनगर पठारचा “विकासमार्ग” काही असंतुष्ट मंडळींकडून ब्रेकर लावून खोदण्याचा प्रयत्न; दत्तात्रय भिलारे यांनी वेळीच केला हस्तक्षेप

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील खाजगी सहभागातून बनवण्यात आलेला गोकुळनगर (Gokulnagar) पठारावर जाणारा सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता काही असंतुष्ट मंडळींकडून ब्रेकर लावून खोदण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भिलारे (Social Activist Dattatray Bhilare) यांनी धाव घेत सदरील काम बंद पाडल्याने, भविष्यातील या रस्त्याचे संभाव्य नुकसान, अर्थात पुन्हा नागरिकांच्या नशिबात येऊ घातलेले खराब रस्त्याचे संकट टळले आहे.

सदरील रस्ता केबल टाकण्याच्या कामासाठी खोदण्यात येत होता, अशी माहिती समोर आली असून, याबाबत दत्तात्रय भिलारे यांनी एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केलेले आहेत. सदरील राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे एका नामांकित मोबाईल कंपनीचे रस्त्याच्या खालून केबल टाकण्याचे कंत्राट असून, त्याने गोकुळनगर पठारावर जाणारा सिमेंट कॉंक्रीटचा “विकासमार्ग” फोडून, त्याखालून वायर टाकण्याचे नियोजन केले होते. त्याला गोकुळनगर पठारावरील रहिवासी असलेल्या त्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याची साथ असल्याचेही भिलारे यांनी ‘चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले.

गोकुळनगर पठारावरील रहिवासी असलेल्या सदरील पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा बेकायदेशीर गावठी मद्यविक्रीचा व्यवसाय (Illegal Liquor Business) याच भागात असून, त्याने या भागात केबल टाकण्यासाठी उप-कंत्राटदार म्हणून काम घेतले असल्याचेही भिलारे यांनी सांगितले आहे. त्याने एका मोठ्या नेत्याचे नाव घेऊन, दमदाटी करून काही भागात केबल टाकली देखील. मात्र मारुती देवस्थान ट्रस्ट (Maruti Devasthan Trust) आणि दत्तात्रय भिलारे यांच्या खाजगी जागेत, भारतभूषण बराटे (Bharat Bhushan Barate) यांच्या स्वखर्चातून बनवण्यात आलेल्या खाजगी रस्त्याच्या भागात, कोणाचीही कोणतीही परवानगी न घेता, वैयक्तिक स्वार्थासाठी सदरील खोदाई सुरु करण्यात आली असल्याने, ती थांबवल्याचे भिलारे यांनी सांगितले.

या विकासमार्गाच्या काही भागात रस्त्याच्या बाजूने ब्रेकर लावून खोदाईचे नियोजन होते. तर रस्ता डोंगरावरून जिथून सुरु होतो, तिथे तब्बल 8 ते 10 इंची कायमस्वरूपी टिकेल असा मजबूत करण्यात आलेला कॉंक्रीट रस्ता फोडून, त्याखालून केबल टाकण्याचे नियोजन असल्याचे समोर आले आहे. एकूणच रस्त्याच्या बाजूने ब्रेकर लावून केलेल्या खोदाईमुळे तीव्र उताराच्या रस्त्याचे सांधे मोकळे होऊन, पावसाळ्यातील वेगवान पाण्याचा त्यात निचरा झाल्याने, भविष्यात ‘पुन्हा रस्ता वाहून जाण्यासारखी’ घटना घडली असती. त्यामुळे पुन्हा या भागात राहणाऱ्या सामान्य जनतेच्या वाट्याला ‘पहिले वाईट दिवस’ येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे खोदाईचे काम थांबवल्याचे दत्तात्रय भिलारे यांनी सांगितले.

तर पठारावर अगोदरच केबलचे काम सुरु झालेले पाहून, नंतर मूळ घाटातील रस्त्यावर घाव घातला जाईल, असा अंदाज आलेला असल्याने भिलारे यांनी संबंधित पदाधिकाऱ्याला रस्ता फोडून अथवा रस्त्याच्या बाजूने कोणतीही खोदाई न करता, वेगळ्या बाजूने केबल टाका अशी विनंती केली होती. मात्र आपल्या पक्षाच्या ताकदीच्या जोरावर संबंधित पदाधिकाऱ्याने काम केल्याचा आरोप दत्तात्रय भिलारे यांनी ‘चेकमेट टाईम्स’शी बोलताना केला आहे. तर आपण अखिल गोकुळनगर सहयोगनगर पठार रहिवासी कृती संघाच्या (Akhil Gokulnagar Sahayognagar Pathar Rahivasi Kruti Sangh) माध्यमातून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही भिलारे यांनी स्पष्ट केले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.