Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): चोरट्यांनी पोलीस वसाहतीमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरुन नेल्याचा (Bike Stolen) प्रकार उघडकीस आल्याने पोलीस वसाहतीच्या (Police Colony) सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरट्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) सर्व्हेलन्स पथकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी 45 हजार रुपये किंमतीची होन्डा कंपनीची युनिकॉर्न (MH 12 HH 7533) गाडी चोरून नेली. (Pune Crime News)
याबाबत सचिन बबन शिंदे (वय - 35 रा. विश्रांतवाडी पोलीस वसाहत, येरवडा - Vishrantwadi Police Colony, Yerawada) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 21 फेब्रुवारी 2023) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिंदे यांनी सोमवारी (दि. 20 फेब्रुवारी 2023) रात्री साडेअकराच्या सुमारास ते राहत असलेल्या बिल्डींगच्या समोर त्यांची दुचाकी पार्क केली होती. मंगळवारी सकाळी कामावर जाण्यासाठी ते दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी गाडीचा शोध घेतला मात्र गाडी सापडली नाही. अखेर येरवडा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली.
विश्रांतवाडी पोलीस वसाहतीमध्ये अनेक पोलिसांची कुटुंबीय राहत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेच्या (Security) दृष्टीने कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा, नियोजन पोलीस विभागामार्फत अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले नाही. पुणे पोलिसांकडून (Pune Police) सुरक्षेच्या दृष्टीने खाजगी सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV), सुरक्षा यंत्रणा, सिक्युरिटी गार्ड नेमण्याच्या सूचना केल्या जातात. (Pune Crime News)
मात्र, पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप याठिकाणी राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. पोलीस वसाहतीमध्ये राहणारे 50 टक्के अंमलदार हे दिवस/रात्र पाळीस असतात पोलीस अंमलदारांकडून गुन्हेगारांवर कारवाई केली जाते. याचा राग मनात धरुन पोलीस अंमलदार यांच्या वाहनाचे नुकसान करणे, पेट्रोल चोरणे, घराच्या खिडक्यांच्या काचा फोडणे असे प्रकार घडत असतात.
तसेच पोलीस वसाहतीच्या परिसरात झाडे झुडपे वाढल्याने अस्वच्छता आहे. वाढलेल्या झाडा झुडपांच्या मागे लपून राहून जवळच्या झोपडपट्टीमधील मुले वाहनांमधील पेट्रोलची चोरी करतात. हे करत असताना वाहनांचे देखील नुकसान करतात. त्यामुळे अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलीस वसाहतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. यामुळे असे प्रकार घडणार नाहीत, अशी मागणी वसाहतीत राहणाऱ्या पोलीस अंमलदार आणि त्यांच्या कटुंबियांकडून होत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84